
भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू
मृत तरुण गोव्यातील म्हापसाचे
अपघातामध्ये टेम्पो चालक गंभीर
वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील लोणावळ्यामध्ये (Lonavala) असलेल्या लायन्स पॉईंट जवळ कार आणि टेम्पो यांच्यात शनिवारी (दि. ६) सकाळी झालेल्या भीषण अपघातात (Accident) दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, टेम्पो चालक गंभीर जखमी झाला आहे. योगेश सुतार आणि मयूर वेंगुर्लेकर (दोघेही रा. म्हापसा, गोवा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, लोणावळ्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने सहराकडे जाणाऱ्या टेम्पोला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, कारमधील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
परभणी-वसमत महामार्गावर कारची समोरासमोर धडक
जिल्ह्यातील वसमत तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहे. परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावरील रहाटीजवळ स्विफ्ट आणि क्रेटा गाडीचा समोरासमोर अपघात झाला. या मार्गावरील अपघातांची मालिका सुरुच असल्याचं दिसून येतं.
बाबाराव साखरे हे स्विफ्ट डिझायर या कारने आरळ येथून परभणीच्या दिशेने येत होते. त्यावेळी समोर समोरून येत असलेली क्रेटा कारच्या चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात कार चालवून समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात बाबाराव दत्तराव साखरे, विमलबाई बालासाहेब जाधव (रा. पिंगळी ता. परभणी) कांताबाई अंबादास कातोरे (रा. आरळ ता. वसमत) या तिघांचा घटनास्थळीच मुत्यू झाला. तर त्यांच्या सोबतचे साईनाथ रामचंद्र काकडे, हरी बालासाहेब जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
Parbhani Crime: भीषण अपघात! परभणी-वसमत महामार्गावर कारची समोरासमोर धडक, जागेवरच तिघांचा मृत्यू
गुन्हा दाखल
या अपघातानंतर स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली व बचावकार्य सुरू केले. अपघातात जखमींना परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून. पोलिसांनी याप्रकरणी क्रेट क्रेटा कार क्रमांक एमएच 22 बीसी 7888 च्या चालकावर भारतीय न्यायसंहिता कायद्याच्या अनुच्छेद 106(1), 281, 125(अ) आणि 125(ब) नुसार ताडकळस पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ताडकळसचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे हे करीत आहेत.