Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्या’ अपघातप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींची येरवडा कारागृहात एकत्रित चौकशी

कल्याणीनगर भागात घडलेल्या हायप्रोफाईल अपघातप्रकरणात आता पुणे पोलीस आरोपींची येरवडा कारागृहात जाऊन एकत्रित चौकशी करणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 05, 2024 | 05:53 PM
'त्या' अपघातप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींची येरवडा कारागृहात एकत्रित चौकशी

'त्या' अपघातप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींची येरवडा कारागृहात एकत्रित चौकशी

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात घडलेल्या अपघातप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. आता पुणे पोलीस आरोपींची येरवडा कारागृहात जाऊन एकत्रित चौकशी करणार आहेत. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणात १० जणांना अटक केली आहे. त्यात पोलिसांकडून एकत्रित चौकशी केली जाणार आहे. तपास अधिकारी सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांनी बुधवारी न्यायालयात अर्ज केला असून, विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी पोलिसांना चौकशी करण्यास परवानगी देखील दिली आहे.

कल्याणीनगर येथे १९ मे रोजी मध्यरात्री एका भरधाव आलिशान कारने आयटी इंजिनिअर तरुणी व तरुणाला धडक दिली होती. त्यात दोघांचाही मृत्यू झाला होता. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या मुलाकडून हा अपघात झाला होता. त्याला ताब्यात घेतले होते. मात्र, त्याला वाचविण्यासाठी अगरवाल कुटूंबिय तसेच इतरांनी अनेक गोष्टी केल्या. त्यात ससून रुग्णालयात या चालक मुलाच्या रक्ताच्या नमुने बदल केले होते. त्याच्या जागी त्याच्या आईचे रक्त घेतले होते. हे ससूनच्या डॉक्टरांना हाताशी धरून करण्यात आले होते.

याप्रकरणी विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, पत्नी शिवानी (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, तसेच अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, कारमधील इतर मुलांच्या रक्ताच्या नमुन्यात बदल करणारे आदित्य अविनाश सूद (वय ५२, रा. बंगला क्रमांक ३, सोपानबाग सोसायटी, घोरपडी), आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. बेलवेडर सोसायटी, विमाननगर) आणि अरुणकुमार सिंग यांना अटक केली.

आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणात नऊ आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपी आशिष मित्तलला रक्ताचे नमुने देण्यास सांगणारा अरुणकुमार देवनाथ सिंग याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सर्व आरोपींच्या विरोधात एकत्रित खटला चालविला जाणार आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट करण्यासाठी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल यांना किती रक्कम दिली जाणार होती, तसेच आरोपींनी त्यांना काही आमिष दाखविले होते का ? यादृष्टीने तपास करायचा आहे. सर्व आरोपींची येरवडा कारागृहात एकत्रित चौकशी करायची आहे, असा अर्ज न्यायालायत दाखल करण्यात आला. तो न्यायालयाने मान्य केला.

हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! ४८ तासात ५ खून; ‘या’ भागात घडल्या घटना

डॉ. तावरेचा न्यायालायत अर्ज

ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरेने याप्रकरणातून वगळण्यात यावे, याबाबत न्यायालायत अर्ज दाखल केला आहे. आशिष मित्तलने खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यासाठी बुधवारी न्यायालायात अर्ज केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश इंगळे यांनी दिली.

Web Title: Accused in porsche accident case will be interrogated in yerwada jail nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 05:51 PM

Topics:  

  • maharashtra
  • Porshe Accident

संबंधित बातम्या

शेती सुधारणांची चुकलेली दिशा! सरकारी योजना का फसल्या? वाचा सविस्तर
1

शेती सुधारणांची चुकलेली दिशा! सरकारी योजना का फसल्या? वाचा सविस्तर

Siddhivinayak Temple Trust : पूरग्रस्तांच्या मदतीला धावला सिद्धिविनायकचा बाप्पा! ट्रस्टकडून “एवढ्या” कोटींची मदत
2

Siddhivinayak Temple Trust : पूरग्रस्तांच्या मदतीला धावला सिद्धिविनायकचा बाप्पा! ट्रस्टकडून “एवढ्या” कोटींची मदत

आशियाई आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकीने भारताच्या नावावर केली चार पदके
3

आशियाई आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकीने भारताच्या नावावर केली चार पदके

Maharashtra Rain Alert : मुंबईत आज ऑरेंज अलर्ट! ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट
4

Maharashtra Rain Alert : मुंबईत आज ऑरेंज अलर्ट! ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.