Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणूस म्हणून जगा; स्वारगेट बलात्कारप्रकरणात मुद्दाम खोटा नॅरेटीव्ह..! पीडितेच्या आक्रोशावर संशय कशाला?

पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या स्वारगेट बसस्थानकामध्ये मुलीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणामध्ये पीडित मुलीवर गंभीर आरोप करण्यात आले असून आरोपीची पाठराखण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 03, 2025 | 03:27 PM
accused is supported pune police serious allegations on victim girl in the Swargate case

accused is supported pune police serious allegations on victim girl in the Swargate case

Follow Us
Close
Follow Us:

अक्षय फाटक : पुणे : स्वारगेट सारख्या चौकात अन् नागरिकांची गर्दी असलेल्या बसस्थानकात पहाटेच्या वेळी तरुणीला धमकावत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणात पुणे पोलिसांनीच संशय निर्माणकरून एकप्रकारे त्या आरोपीला मदत केल्याचे बोलले जाऊ लागले आहे. अधिवेशन अन् पोलिसांची “पोर्शे अपघात, बोपदेव घाट बलात्कार” उडालेली इभ्रत, त्यात हे प्रकरण गाजले तर कोणावरही ‘शेकू’ शकते यामुळे पोलिसांनीच हे प्रकरण संशयाच्या बोहऱ्यात नेऊन सोडले. ती आरोपीसोबत पूर्वीपासून संपर्कात होती, त्यांच्यात कॉल झालेत, ओळख होती, अशी बोंब मारली गेली. परंतु, प्रत्यक्षात पोलिसांच्या कॉल डिटेल्समध्ये असे कुठेही आढळून आलेले नाही. तर, त्यांची ओळखही नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, यासर्वांचा फायदा आरोपीने घेत ‘सहमतीने आमच्यात संबंध’ झाले, असे सांगण्यास सुरूवात केली. एकूण याप्रकरणांत ‘पुणे पोलिसांना’ काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण, हा आटापिटा फक्त अधिवेशन गाजू नये आणि ते कोणावर शेकू (बदली होऊ नये) नये, यासाठी असल्याचे मत काही जानकर अधिकाऱ्यांचे आहे.

स्वारगेट बसस्थानकात (दि. २५ फेब्रुवारी) २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. नराधम दत्तात्रय गाडेला पोलिसांनी गुरूवारी मध्यरात्री गुनाट या गावातून अटक केली. बलात्काराच्या या घटनेने पुण्यासह राज्यभरात खळबळ उडाली. बसस्थानकातच महिला, मुली सुरक्षित नसतील तर? असा प्रश्न उपस्थित करून सरकार व पुणे पोलिसांकडे बोट दाखविले जाऊ लागले. पुण्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचे चित्र देखील यामुळे पुन्हा प्रकार्षाने जाणवू लागले होते.

राजकीय बाातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

यापूर्वी घडलेल्या पोर्शे अपघातात पोलिसांची संशयाची भूमिका, बड्या बिल्डराच्या पूत्राला वाचविण्याचे झालेले प्रयत्न व एकूण प्रकरण पोलिसांच्या चांगलेच अंगाशी आले होते. नंतर काही दिवसांत बोपदेव घाटात सामूहिक बलात्कार प्रकरण घडले. यात देखील आरोपींचा शोध आणि एकूण घटनेवरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर व कामकाजावर प्रश्न निर्माण झाले. ‘पुणे खरंच आता सुरक्षित आहे का’, असेही बोलले जाऊ लागले. या घटनांसह सत्ताधारी विधानसभा आमदारांच्या मामाचे अपहरण तसेच खून आणि नुकतेच घडलेले माजी मंत्री व आमदारांच्या मुलाने कौटुंबिक कारणातून चार्टर बुककरून “बँकॉक”ला जाण्याचा केलेला प्रयत्न. नंतर नाट्यमय घडामोडीवरून पुणे पोलिसांनी “उडते विमान ढगातूनच फिरवत” पुन्हा माघारी बोलवून ‘बाप-लेकाची’ घडवून आणलेली भेट. नुकतेच घडलेल्या कार्यकर्ता मारहाण प्रकरण आणि नंतर केंद्रीय मंत्र्यांनी माध्यमांमध्ये राग-राग व्यक्त केल्यानंतर पोलिसांना कडक भूमिका दाखवत या गुंडावर कारवाईची दाखवलेली तत्परता. यात देखील बसत नसताना केवळ ‘कोथरूडच्या राजकीय’ राजकारणात मोक्का लावला. पण, पोलीसच यावर तोंडावर पडतील असे आता अधिकारीच बोलून दाखवत आहेत.

मोठे फेरबदल होण्याची भीती

एकूण दोन्ही घटनांमध्ये राजकीय ‘पॉवर’समोर झुकलेले पोलीस व नंतर कारवाईसाठी केलेले अपार प्रयत्न यामुळेही पोलिसांवर संशयाने पाहिले जाऊ लागले आहे. यामुळे शहर पोलीस सध्या बदनामी झेलत विश्वासहार्ता हरवून बसले आहे. दुसरीकडे आंतराष्ट्रीय ड्रग्जप्रकरणानंतर म्हणावे असे उत्तूंग व सांगण्यासारखे कामकाज नाही. त्यात आता अधिवेशनाच्या तोंडावर बसस्थानकात घडलेल्या बलात्काराने तर राज्यच ढवळून निघाले. मग, पुण्याची सुरक्षा ते पुणे पोलीस यावर प्रचंड प्रेशर आले. त्यात तीन दिवस ५०० पोलिसांचा फौजफाटा जंगजंग पछाडूनही आरोपी न सापडने यामुळे आता कोणाची तरी विकेट जाईल किंवा मोठे फेरबदल होतील, अशी कुजबूज सुरू झाली होती. परंतु, अपयश, पुण्याची झालेली सुरक्षेची वाताहत यामुळे याप्रकरणात संशय निर्माण करण्यास सुरूवात झाली. त्यामुळे मात्र पोलीस दलात वरिष्ठांबद्दल मोठी खदखद निर्माण झाली आहे.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असताना आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पोलिसांच्या गोटातून पीडित मुलीची बदनामी होईल असे तर्क वितर्क पसरवले जात आहेत. नराधम दत्तात्रय गाडेने बलात्कार नसून संगनमतीने झालेले संबंध असल्याचा दावा केला, पण त्यापुर्वीच यासाठी वातावरण निर्माती करण्यात आली होती. पीडितेच्याच चारित्र्यावर संशय निर्माण सुरू झाले. तसे, चर्चा घडवून आणली जाऊ लागली. हे सर्व पोलिसांच्या माध्यमातून झाले. सोशल मीडियातून जाहिर बोलून वळून दिले गेले.

महाराष्ट्रसंबधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

संशय व सत्यता…

स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडित तरुणी आणि नराधम यांच्यात पूर्वीपासून ओळख ? असल्याचा आरोप केला आहे.
पीडिता अनेकदा स्वारगेटवरुन प्रवास करते, तरीही नराधमाचे तिच्यासोबत कोणतेही संबंध नाहीत. त्यांच्यात गेल्या वर्षभरात एकही कॉल झालेला नाही. मुलीकडे त्याचा मोबाईल क्रमांक सेव्ह नाही. ना आरोपी दत्तागाडेच्या मोबाईल मुलीचा क्रमांक नाही. हे पोलिसांच्या कॉल हस्ट्रीतून स्पष्ट झालेले आहे. व्यवहार झाल्याची चर्चा व सहमतीने आमच्यात संबंध झाल्याचा दावा ? पीडिता आणि नराधम दत्तात्रय यांच्यात पैसे पूर्ण न दिल्याने मुलीने तक्रार केल्याचे बोलले गेले. प्रत्यक्षात त्यांच्यात व्यवहार किंवा सहमत असे काहीच नव्हते. बँकेच्या तपासणीतून व ऑनलाईन पडताळणीतून हे स्पष्ट झाले.

घटनेनंतरही ते एकत्र भेटले

स्वारगेटमधील घटनेनंतर पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यात भेट झाल्याचे बोलले गेले. मात्र त्या दोघांत नंतर कोणतीही भेट झालेली नाही. किंवा फोन्स झालेले नाहीत. तरुणीचे लोकेशन व आरोपीचे लोकेशन एकाच भागात असले तरी वेगवेगळ्या ठिकाणचे आहे. तरुणी गाडीत बसल्यापासून जवळपास अर्धा ते पाऊन तास फोनवर त्याच्या मित्राशी बोलत होती. मित्राच्या सल्यानंतर ती बसमधून उतरली आणि पीएमपीने स्वारगेटला आली. थेट पोलीस ठाण्यात गेली. तरुणीने आरडाओरडा केला, पण तिचा आवाज बाहेर आला नाही. नंतर आरोपीने तिला गळा दाबून मारण्याची धमकी दिली. मी खरचं मारेल असेही तो बोलला. तरुणी नोकरदार आहे. तिला घटनांबाबत माहिती आहे. त्यामुळे ती थेट भितीचे छायेत गेली अन् मला मारू नका, तुम्ही काही करा असे म्हणाल्याची माहिती सूत्रांची आहे.

जखमा, हत्या किंवा घृणास्पद म्हणजेच बलात्कार का ?

स्वारगेटमधील बलात्कारप्रकरणात मुलीला जखमा, किंवा तिचे कपडे फाटले का, अशा डोक ठिकाणावर नसलेल्यांकडून सोशल मिडीयात प्रश्न निर्माण केले जात आहेत. मात्र, घृणास्पद, हत्या, प्रचंड वेदना देऊन चेहरा विद्रुप करणे, जखमा होणे, असेच केले असेल तरच बलात्कार का असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. स्वारगेटमधील बलात्कार नाही का, त्या तरुणीची मानसिकता प्रचंड खचलेली आहे. त्यातही अशा चर्चा व माध्यमांमधील बातम्यांमुळे हे झाले असले तरी पोलिसांनीच हे घडवून आणल्याचे बोलले जाऊ लागले आहे. दरम्यान, परिमंडळ दोनमधील महिला अधिकाऱ्यांना हे समजल्यानंतर त्यांचेही डोळे पानावले गेले आहेत. बलात्काराची घटना असताना देखील ती खोटी व त्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यास सुरूवात केल्याने त्यांनी प्रचंड राग देखील व्यक्त केला आहे.

Web Title: Accused is supported pune police serious allegations on victim girl in the swargate case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • crime news
  • pune crime case
  • Pune Police

संबंधित बातम्या

बुलढाण्यातील कुख्यात गुंड बाब्याची निर्घृण हत्या, आरोपींनी चाकू खुपसला अन्…; भर रस्त्यात थरार
1

बुलढाण्यातील कुख्यात गुंड बाब्याची निर्घृण हत्या, आरोपींनी चाकू खुपसला अन्…; भर रस्त्यात थरार

Sindhudurg Crime : शहरात वाढतेय गुन्हेगारी प्रवृत्ती; मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर
2

Sindhudurg Crime : शहरात वाढतेय गुन्हेगारी प्रवृत्ती; मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर

अमरावतीच्या बडनेरात धारदार शस्त्राने वार करून लिपिकाची हत्या; रस्त्यावर फेकून दिला मृतदेह अन्…
3

अमरावतीच्या बडनेरात धारदार शस्त्राने वार करून लिपिकाची हत्या; रस्त्यावर फेकून दिला मृतदेह अन्…

Crime News : टोळक्याकडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; डोक्यात दगड घातला अन्…
4

Crime News : टोळक्याकडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; डोक्यात दगड घातला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.