Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मला माझा नवरा परत द्या; गायब पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांच्या पत्नीची विनंती

मला माझा नवरा परत द्या, अशी ह्रदयाला चटका लावणारी विनंती बेपत्ता पोलीस कर्मचारी निखिल कैलास रणदिवे यांच्या पत्नी अक्षदा रणदिवे यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 08, 2025 | 12:30 AM
मला माझा नवरा परत द्या; गायब पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांच्या पत्नीची विनंती

मला माझा नवरा परत द्या; गायब पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांच्या पत्नीची विनंती

Follow Us
Close
Follow Us:
  • माझा नवरा मला परत द्या
  • माझ्या दोन लहान मुलांकडे बघा
  • निखिल रणदिवे यांच्या पत्नीची पोलिसांना विनंती
यवत : “माझे पती गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा फोन बंद आहे. माझ्या दोन लहान मुलांकडे बघा… मला माझा नवरा परत द्या.” अशी ह्रदयाला चटका लावणारी विनंती बेपत्ता पोलीस कर्मचारी निखिल कैलास रणदिवे यांच्या पत्नी अक्षदा रणदिवे यांनी दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या समोर केली आहे. यवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या निखिल रणदिवे यांनी मानसिक तणाव, सततची ड्युटी आणि वरिष्ठांकडून होत असलेल्या छळामुळे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भावनिक नोट पोस्ट केली होती. त्यानंतर ते बेपत्ता झाले. त्यांच्या फोनचे नेटवर्क गेल्या गुरुवारपासून बंद आहे. त्यांच्या जवळपास सुसाईड नोटही आढळल्यामुळे ही घटना अधिक गंभीर झाली आहे.

अक्षदा रणदिवे म्हणाल्या, “गेल्या वर्षभरापासून माझे पती निखिल प्रचंड मानसिक तणावात होते. सुट्टी मिळत नव्हती. ड्युटीवरून आले तरी लगेच दुसऱ्या ठिकाणी रवाना करण्याचे आदेश मिळत. मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचा त्यांनी शब्द दिला होता, पण त्याच दिवशी बाहेरगावी ड्युटी लावण्यात आली.” त्यांनी पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सतत त्रास दिल्याचा आरोप केला आहे.

तपासात विलंबाची चर्चा

तीन दिवस उलटूनही अद्याप तपासात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप रणदिवे यांच्या कुटुंबीयांनी व सहकाऱ्यांनी केला आहे. शनिवारी अक्षदा रणदिवे आपल्या दोन लहान मुलांसहित यवत पोलीस ठाण्यात आल्या. मात्र, त्या वेळी वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित होते. फक्त “तपास सुरू आहे” एवढेच उत्तर उपविभागीय अधिकारी दडस यांनी दिले.

बदली असूनही यवतला रोखल्याचा आरोप

रणदिवे यांची काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. मात्र, अपूर्ण कामाचे कारण सांगून त्यांना यवत ठाण्यातच थांबवण्यात आले. इतर कर्मचाऱ्यांना मात्र तत्काळ रिलीव्हिंग देण्यात आले, असं सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

पोलिस दलात संतापाचा उद्रेक

या घटनेनंतर ग्रामीण पोलीस दलात असंतोष पसरला असून, मागासवर्गीय कर्मचारी यामध्ये जास्त अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. वंचित बहुजन आघाडी आणि इतर मागासवर्गीय संघटनांनी आंदोलनाची चेतावणी दिली आहे. संघटनेचे कार्यकर्ते रोहित गजरमळे आणि प्रथमेश गायकवाड यांनी, “तपासात पक्षपात होत आहे. निखिल रणदिवे हे छळाचे बळी आहेत. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल,” असा इशारा दिला.

Web Title: Missing police employ nikhil randives wife has made a request to the police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

पत्नीचा वैयक्तिक निर्वाह भत्त्याचा दावा फेटाळला; पुणे कुटुंब न्यायालयाचा निर्णय
1

पत्नीचा वैयक्तिक निर्वाह भत्त्याचा दावा फेटाळला; पुणे कुटुंब न्यायालयाचा निर्णय

Ichalkaranji Mayor : वस्त्रनगरीचा पहिला महापौर कोण? अनुभवी सदस्यांसह नवख्या सदस्यांत रस्सीखेच
2

Ichalkaranji Mayor : वस्त्रनगरीचा पहिला महापौर कोण? अनुभवी सदस्यांसह नवख्या सदस्यांत रस्सीखेच

वसंत मोरेंच्या आरोपांवर प्रशांत जगतापांचं प्रतिउत्तर, म्हणाले; त्यांनी आता…
3

वसंत मोरेंच्या आरोपांवर प्रशांत जगतापांचं प्रतिउत्तर, म्हणाले; त्यांनी आता…

Pune ZP Election : निवडणूक प्रचाराची जिल्हाभरात उडाली राळ; जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी
4

Pune ZP Election : निवडणूक प्रचाराची जिल्हाभरात उडाली राळ; जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.