Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyangar News: जामखेडच्या नृत्यांगनाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या माजी नगरसेवकाला अटक, काय आहे प्रकरण?

जामखेड नृत्यांगना आत्महत्याप्रकरणी माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 07, 2025 | 03:37 PM
जामखेडच्या नृत्यांगनाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या माजी नगरसेवकाला अटक, काय आहे प्रकरण?

जामखेडच्या नृत्यांगनाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या माजी नगरसेवकाला अटक, काय आहे प्रकरण?

Follow Us
Close
Follow Us:
  • जामखेड नृत्यांगना आत्महत्या प्रकरण
  • माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला अटक
  • जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
जामखेड येथील एका कलाकेंद्रात नर्तिका असलेल्या दिपाली पाटील हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून जामखेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घटना घडल्यानंतर तब्बल चोवीस तासांनंतर गुन्हा दाखल झाला होता. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत गायकवाड याच्या पत्नीने भाजपाकडून प्रभाग ५ मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढविलेली आहे. निवडणुकीचा निकाल अजून लागलेला नाही. तत्पूर्वीच घडलेल्या घटनेमुळे जामखेड शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

निवडणुकीतील प्रचारावेळी आमदार रोहित पवारांनी भाजपाकडून जामखेडमध्ये गुंड, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्याची टीका प्रत्येक भाषणात केली होती. यानंतर मतदान प्रक्रिया तीन दिवसांपूर्वी पार पडली. मातमोजणी अजून व्हायची आहे. त्या अगोदरच माजी नगरसेवक तथा निवडणुकीतील उमेदवार पती गजाआड झाल्याने आमदार रोहित पवारांनी केलेल्या टिकेला पृष्टी मिळाली आहे. तसेच यासंदर्भात सर्वप्रथम आमदार पवार यांनीच सोशल मीडियावर पोस्ट टाकून संशयाची सुई गायकवाड याच्या दिशेने वळविली होती. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यासाठी पडद्यामागे झालेल्या सर्व हालचाली निष्फळ ठरल्या.

Solapur Crime: गोव्यात तीन वर्षांचा मुलगा सोलापुरातील बेघर महिलेबरोबर; मानव तस्करीचा संशय, डीएनए चाचणी सुरू

काय आहे हे प्रकरण?

आत्महत्या केलेली नर्तिका दिपाली हिची आई दुर्गा गायकवाड यांनी दिलेल्या फियदिवरुन संदीप गायकवाड याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. फियदितील आशय असा होता की संदीप गायकवाड हा दिपाली पाटील हिला लग्न करण्यासाठी वारंवार मागणी करीत होता. या मागणीसाठी त्याच्याकडून दिपालीचा छळ सुरू होता. त्यांच्या या छळाला कंटाळून दिपाली हिने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

गुन्हा कसा दाखल झाला?

विशेष म्हणजे ही घटना गुरुवार (ता.०४) रोजी घडली. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी आवाज उठविला आणि लक्ष वेधणारी पोष्ट सोशल मेडियाच्या माध्यमातून शेअर केली. त्यानंतर तब्बल पाच तासांनी जामखेड पोलिसांनी संदीप गायकवाड याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. घटना घडल्याची वेळ आणि गुन्हा दाखल झाल्याची वेळ यादरम्यान संशय व्यक्त करणारी चर्चा दबक्या आवाजात शहरात सुरू होती. मात्र यासंदर्भात गुन्हा दाखल होईल पर्यंत बोलण्यासाठी कोणी धजावत नव्हते. दरम्यान आमदार पवार यांनी सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आणि संबंधित व्यक्ती विरुद्ध संशय व्यक्त केला.

Chandrapur Crime: माझ्या पत्नीला पळवून का नेलं? विचारणं बेतलं जीवावर; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची तलवारीने केली हत्या

हिवाळी अधिवेशनात मुद्दा येणार?

हे प्रकरण सत्ताधारी पक्षाच्या व्यक्तीशी संबंधित होते म्हणून तर गुन्हा दाखल होण्यास वेळ लागला अशीही चर्चा शहरात सुरू आहे, मात्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर आमदार रोहित पवार हे गप्प बसणार नाहीत आणि हे प्रकरण अंगाशी येईल म्हणून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आणि गुन्ह्याची प्रक्रिया पूर्ण केली.

Web Title: Ahilyangar crime former councilor arrested for inciting jamkhed dancer to commit suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ahmednagar Crime
  • crime news
  • Sucide

संबंधित बातम्या

Thane Crime: कुटुंब न्यायालयाच्या आवारात कारमध्ये सामूहिक अत्याचार, केकमध्ये गुंगीचे औषध दिले… ; आरोपी युट्युब पत्रकार
1

Thane Crime: कुटुंब न्यायालयाच्या आवारात कारमध्ये सामूहिक अत्याचार, केकमध्ये गुंगीचे औषध दिले… ; आरोपी युट्युब पत्रकार

बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकची बॅटरी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या
2

बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकची बॅटरी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या

Ahilyanagar :  राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप
3

Ahilyanagar : राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Ahilyanagar News: राहुरीत 85 वाहनांवर धडक कारवाई! 44 हजारांचा दंड वसूल करत पोलिसांची मोहीम यशस्वी
4

Ahilyanagar News: राहुरीत 85 वाहनांवर धडक कारवाई! 44 हजारांचा दंड वसूल करत पोलिसांची मोहीम यशस्वी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.