Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: आमच्या कंपनीत पैसे गुंतवल्यास…; विविध आमिषे दाखवत ११ जणांची तब्बल १ कोटींची फसवणूक

राज्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासन याविरुद्ध कठोर कारवाई करताना दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 18, 2024 | 02:41 PM
Crime News: आमच्या कंपनीत पैसे गुंतवल्यास…; विविध आमिषे दाखवत ११ जणांची तब्बल १ कोटींची फसवणूक
Follow Us
Close
Follow Us:

माळशिरस: राज्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. हीट अँड रन, महिलांवरील अत्याचार असतील तसेच डिजिटलयुगात सायबर क्राईम आणि ऑनलाइन फसवणुकीचे  गुन्हे वाढले आहेत. पोलीस प्रशासन याविरुद्ध कठोर कारवाई करताना दिसून येत आहे. मात्र काही प्रमाणात हे ऑनलाइन फ्रॉडचे गुन्हे होताना दिसून येत आहे. अकलुज येथे देखील असाच एक फसवणुकीचा गुन्हा घडला आहे. यामध्ये ११ जणांची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

आमच्या कंपनीत पैसे गुंतवल्यास मुद्दलासह नफा देतो, अशी योजना सांगून ५ जणांनी मिळून ११ जणांकडून २० महिन्यात वेगवेगळी आमिषे दाखवत १ कोटी रूपयाची फसणूक केल्याचे समाेर आले आहे.  याप्रकरणी अशोक करडुले, श्रीधर नागरगोजे, मनोज टकले, विजय जाधव व अंकुश धाकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोघांना पोलिसांनी माळशिरस येथे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अमित मोहन रणनवरे यांनी तक्रार केली. अकलूज पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक कैलास करडुले (रा. खेड, पुणे), श्रीधर नाथराव नागरगोजे (रा. नागदरा, बीड), मनोज टकले (रा. केज, बीड), विजय रामचंद्र जाधव (रा. निमगाव, माळशिरस) व अंकुश धाकडे (रा. अमरावती) या पाचजणांनी त्यांच्या क्युस्ट्रा फायनान्स, क्युपे, अलायंन्स सोलुशन या कंपनीत गुंतवणूक करुन मुद्दल व नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १२ डिसेंबर २०२२ ते ११ ऑगस्ट २०२४ या २० महिन्यात अमित रणनवरे (रा. मांडकी, ता. माळशिरस यांच्यकडून २७ लाख ४८ हजार, नागन्नाथ पांडुरंग जानकर याच्याकडून १० लाख रुपये, शिवाजी ठवरे यांच्याकडून २ लाख रुपये, अजित कदम यांच्याकडून ४ लाख रुपये, ज्योतीराम नलवडे यांच्याकडून ४ लाख रुपये, एन. डी. खरात यांच्याकडून १ लाख रुपये, रोहित भुजबळ यांच्याकडून ४ लाख रुपये, चैतन्यकुमार देवकाते यांच्याकडून १५ लाख २० हजार रुपये, अनिस मुलाणी यांच्याकहून ३ लाख रुपये, राहुल देशमुख यांच्याकडून ४ लाख रुपये, शशिकांत रणनवरे यांच्याकडून ४ लाख रुपये, दादा जानकर यांच्याकडून ३ लाख रुपये अशी एकुण१ कोटी १३ लाख ३३ हजार रुपये रक्कम घेतली.

पोलीसांनी पाच जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. त्यातील श्रीधर नागरगोजे, विजय जाधव यांना अटक करुन माळशिरस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. विभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,पोलीस हेड कॉन्सटेबल अमोल बकाल, विकी घाडगे, समीर पठाण तपास करीत आहेत.

हेही वाचा: Pune Crime : बांधकाम व्यावसायात गुंतवणूकीच्या आमिषाने फसवणूक, तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

 गुंतवणूकदारांना जिवे मारण्याची धमकी

घेतलेल्या रकमेतील नागनाथ जानकर व त्यांच्यामार्फतच्या लोकांना ७ लाख रुपये मुद्दल व ७ लाख रुपये नफा असे एकुण १४ लाख रुपये कंपनीने त्यांच्या खात्यावर परत जमा केले. त्यानंतर कोणालाही मुद्दल व त्याचा नफा दिला नाही. गुंतवलेल्या रक्कमा व त्याचा नफा मागितला असता गुंतवणूकदारांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली . दरम्यान आम्ही व्यवसायातील अयुष्यभराची कमाई उसनवार व कर्जे काढून रक्कम गुंतवलली आहे. वेगवेगळी आमिषे दाखवून पैसे गुंतविण्यास भाग पाडले आहे. कंपनी बंद करुन फसवणूक करणारे निघून गेल्याचे अमित रणनवरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Accused online fraud with 11 peoples and looted 1 crore crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 02:41 PM

Topics:  

  • cyber crime
  • online fraud

संबंधित बातम्या

Mumbai Crime : मुंबईत ८१ वर्षीय महिला ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात; ८.७० कोटी गमावले, नेमकं काय घडलं?
1

Mumbai Crime : मुंबईत ८१ वर्षीय महिला ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात; ८.७० कोटी गमावले, नेमकं काय घडलं?

अति हाव नडली! शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले अन् ‘इतक्या’ कोटींना गंडवले; आरोपीला थेट ओडिशातून…
2

अति हाव नडली! शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले अन् ‘इतक्या’ कोटींना गंडवले; आरोपीला थेट ओडिशातून…

देशात डीजिटल गुन्हेगारांचा सुळसुळाट, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
3

देशात डीजिटल गुन्हेगारांचा सुळसुळाट, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

Safer Internet India आणि META एकत्र, ऑनलाइन फसवणूक व घोटाळ्यांचा सामना करण्‍यासाठी केली पार्टनरशिप
4

Safer Internet India आणि META एकत्र, ऑनलाइन फसवणूक व घोटाळ्यांचा सामना करण्‍यासाठी केली पार्टनरशिप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.