Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: माजी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याची बनावट ओळख; ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून वृद्ध महिलेची 3.71 कोटींची फसवणूक

मुंबईत सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याचं भासवून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत सायबर भामट्यांनी एका वृद्ध महिलेकडून तब्बल 3.71 कोटी रुपये उकळले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 30, 2025 | 03:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • माजी CJI चंद्रचूड नावाचा गैरवापर करून सायबर फसवणूक
  • ‘डिजिटल अरेस्ट’ व मनी लॉन्ड्रिंगची बनावट भीती
  • 3.71 कोटींची फसवणूक
मुंबई: मुंबईतून सायबर गुन्ह्याचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका वृद्ध महिलेला सायबर भामट्यांनी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड अशी बनावट ओळख सांगून तब्बल 3.71 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. डिजिटल अरेस्टची धमकी देऊन फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी गुजरातमधून एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना १८ ऑगस्ट ते १३ ओक्टोम्बर दरम्यान घडली आहे.

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

कशी केली फसवणूक?

१८ ऑगस्ट रोजी महिलेला एक फोन कॉल आला आणि तेव्हापासून फसवणुकीला सुरुवात झाली. फोन करणाऱ्या आरोपीने स्वतःची ओळख कुलाबा पोलीस स्टेशनमधील अधिकारी म्हणून करून दिली आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी संबंधित महिलेच्या बँक खात्याचा वापर केला जात असल्याचं त्याने वृद्ध पीडितेला सांगितलं. त्याने तिच्या बँक खात्याची माहिती मागितली आणि याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असल्याचे भामट्याने सांगितले. त्यांनतर एसके जयस्वाल म्हणौन स्वतःला सादर करून, आरोपीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पीडितेला डिजिटल अरेस्टची भीती दाखवली आणि तिला जामीन मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणून पीडितेसमोर सादर

भामट्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून कोर्ट रूममध्ये एका व्यक्तीला सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणून पीडितेसमोर सादर केलं. तिच्या बँक खात्यातील गुंतवणुकीच्या व्हेरिफिकेशनसाठी तिच्याकडे बँक खात्याची माहिती मागितली तसेच काही रक्कम पाठवण्यास सांगितले. पीडितेने दोन महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 3.75 कोटी रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर, महिलेने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपींचा फोन बंद लागत होता. तेव्हा पीडितेला आपली फसवणूक करण्यात आल्याचे समजले.

गुजरात मधुन एकाला अटक

वृद्ध महिला तातडीने पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणूक तसेच इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा पीडितेचे पैसे हे बऱ्याच ‘म्यूल’ खात्यांमध्ये ट्रान्सफर केले असे त्यांच्या लक्षात आले. त्यापैकी एक गुजरातमधील सुरतमधून आढळून आल्याचे तपासात समोर आले. त्यांनी गुजरातमधून एका व्यक्तीला अटक केले आहे.

म्यूल खातं म्हणजे काय?
‘म्यूल’ म्हणजे एक बँक खातं ज्याचा वापर गुन्हेगार खातेधारकाच्या माहितीशिवाय किंवा त्याच्या माहितीशिवाय बेकायदेशीर पैसे मिळविण्यासाठी, ट्रान्सफर करण्यासाठी किंवा लॉन्ड्रिंग करण्यासाठी करतात.

धक्कादायक ! अपहरणानंतर ‘त्या’ व्यापाऱ्याची अखेर हत्या; चाळीसगाव घाटात सापडला मृतदेह

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: वृद्ध महिलेकडून किती रकमेची फसवणूक झाली?

    Ans: सायबर भामट्यांनी तब्बल 3.71 कोटी रुपयांची फसवणूक केली.

  • Que: आरोपींनी फसवणुकीसाठी कोणता प्रकार वापरला?

    Ans: ‘डिजिटल अरेस्ट’, मनी लॉन्ड्रिंगची भीती आणि बनावट कोर्टरूम व्हिडीओ कॉलचा वापर केला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुजरातमधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Mumbaiusing a fake identity of former chief justice chandrachud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 03:26 PM

Topics:  

  • crime
  • cyber crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: अल्पवयीन मुलाचं अपहरण करून इन्स्टाग्रामवरून मागितली खंडणी २० लाखांची, चौघांना अटक
1

Navi Mumbai Crime: अल्पवयीन मुलाचं अपहरण करून इन्स्टाग्रामवरून मागितली खंडणी २० लाखांची, चौघांना अटक

पोलिसांचंही बँक खातं नाही सुरक्षित ! सायबर चोरट्यांनी तब्बल साडेआठ लाखांना घातला गंडा
2

पोलिसांचंही बँक खातं नाही सुरक्षित ! सायबर चोरट्यांनी तब्बल साडेआठ लाखांना घातला गंडा

‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर अखेर Tara Sutariaनं सोडलं मौन, AP Dhillon बाबत वीर पहाडियाची कमेंट चर्चेत
3

‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर अखेर Tara Sutariaनं सोडलं मौन, AP Dhillon बाबत वीर पहाडियाची कमेंट चर्चेत

Crime News : वर्षभरामध्ये ६५ गुन्ह्यात १२७ जेरबंद; ९३ लाखांचा अमलीपदार्थ साठा जप्त; शहर पोलिसांची मोठी कारवाई
4

Crime News : वर्षभरामध्ये ६५ गुन्ह्यात १२७ जेरबंद; ९३ लाखांचा अमलीपदार्थ साठा जप्त; शहर पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.