crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
अमरावतीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणावर अॅसिड हल्ला झाला आहे. अॅसिड हल्ला करणारे दोघे जण होते. आधी त्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला अडवून मारहाण केली त्यानंतर त्याच्याकडील रोक रक्कम, मोबाईल आणि इतर वस्तू हिसकावून घेत अॅसिड फेकलं. अॅसिड हल्ला झालेल्या तरुणाचे नाव अमोल इसाळ आहे. तो मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगावचा आहे. अमोलवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
Jalna News: संतापजनक! जालन्याच्या डीवायएसपींनी आंदोलकाच्या पार्श्वभागावर मारली लाथ, व्हिडीओ वायरल
नेमकं काय घडलं?
अमरावतीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणावर अॅसिड हल्ला झाला आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, अमोल इसाळ हा तरुण बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगावमध्ये रविवारी दर्शनासाठी गेला होता. त्यावेळी काही तरुणांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर अकोला खामगाव महामार्गावर दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला अडवून मारहाण केली. त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल आणि इतर वस्तू हिसकावून घेत त्याच्यावर अॅसिड फेकलं. हल्ल्यानंतर आरोपींनी अमोलला रस्त्याच्या कडेला फेकून पळ काढला.
या हल्ल्यानंतर काही नागरिकांनी तत्काळ अमोलला खामगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी खामगावच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन काटेच्या सहकाऱ्यांनी अनोळखी व्यक्ती म्हणून अमोलला अकोल्यातील शासकीय रुग्णालयात सोमवारी हलविण्यात आले आहे.
पिडीताच्या भावाने केलेला आरोप काय?
अमोलचा मोठा भाऊ स्वप्नीलने हा हल्ला अमोलच्या रूम पार्टनरने केल्याचा संशय व्यक्त केला आहे. अमोल आणि त्याच्या रूम पार्टनरमध्ये यांच्यात गेल्या दीड महिन्यापासून वाद सुरु होते, त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली असावी असा अंदाज त्याने व्यक्त केला आहे. अमोलने देखील हल्लेखोरांची ओळख पटवता येईल, असे सांगितले असून, “त्यांचे फोटो दाखवले गेले तर मी ओळखू शकतो,” असे जखमी अवस्थेत सांगितले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला असून या घटनेचा प्रेम प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचाही सध्या पोलीस तपास करत आहे. अमोलला त्याच्या पुढील उपचारासाठी त्याच्या मूळ गावी यवतमाळच्या बाभुळगाव येथे पाठवण्यात आलं आहे.
पती प्रेयसीसोबत दिसताच पत्नीचा पारा चढला; दोघांना चांगलाच चोपला
नागपुरात एका महिलेने तिच्या पतीसह त्याच्या प्रेयसीला चांगलाच चोप दिला. विवाहित असूनही दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवणाऱ्या पुरुषाला पत्नीच्या कुटुंबाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.
पती प्रेयसीसोबत दिसताच पत्नीचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर पत्नीसह तिच्या कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात प्रेयसीचा हात फॅक्चर झाला असून, पुरुषही जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५५ वर्षीय राजेंद्र शेती करतात. विवाहित असूनही अर्पण नावाच्या महिलेसोबत त्यांचे प्रेमसंबंध होते. ते आपला बहुतांश वेळ तिच्यासोबत घालवत असल्यामुळे त्यांची पत्नी आणि कुटुंबातील सदस्य नाराज होते. अशातच, राजेंद्र प्रेयसी अर्पणसोबत असल्याचे पत्नीच्या कुटुंबीयांना समजले.
तेव्हा राजेंद्र यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांनी घोगली चौकात बोलावून राजेंद्रला जाब विचारणे सुरू केले. प्रकरण तापले आणि पत्नीच्या कुटुंबीयांनी राजेंद्रसह त्याच्या प्रेयसीला बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत काठीचा वापर करण्यात आल्याने अर्पणचा हात मोडला.
गोरेगावमध्ये तरुणीची आत्महत्या; 23 व्या मजल्यावरून उडी घेऊन संपवलं जीवन