
नवी दिल्ली: गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेवर लघवी करणाऱ्या पुरुषाविरुद्ध दिल्ली पोलिसांच्या आदेशानुसार ब्युरो ऑफ इमिग्रेशनने लुक आउट सर्कुलर (LOC) जारी केले आहे. याशिवाय आरोपीची माहिती मिळावण्या संदर्भात दिल्ली पोलिसांचे एक पथक आरोपी एस मिश्राच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी मुंबईत पोहोचले आहे.
[read_also content=”मंदिराच्या घुमटाला आदळलं प्रशिक्षणार्थी विमान; एका पायलटचा दुर्दैवी मृत्यू, दुसरा गंभीर जखमी https://www.navarashtra.com/india/trainee-plane-crashes-into-temple-dome-one-pilot-unfortunately-killed-the-other-seriously-injured-nrps-359613.html”]
या प्रकरणी एएनआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने आणखी एक माहिती समोर आली आहे की, या प्रकरणी आतापर्यंत केवळ चार क्रू मेंबर्स तपास कामात सहभागी झाले असून इतर क्रू मेंबर्स आज होणार आहेत. तर, एअर इंडियाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई करत आरोपीवर 30 दिवसांची प्रवास बंदी घातली आहे. नियमांनुसार, ती अशा प्रवाशाला समान जास्तीत जास्त शिक्षा देऊ शकते.
आरोपींविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिस अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाने केलेल्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध आयपीसी कलम 354, 509 आणि भारतीय विमान वाहतूक कायद्याच्या कलम 23 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला आणि आरोपी दोघेही दिल्लीत राहत नाहीत. महिलेच्या आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांकडूनही माहिती मागवण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
पोलिस कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवणार आहेत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मुंबईतील मीरा रोड भागातील रहिवासी आहे. तो सध्या मुंबईत नाहीत. त्याला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी पथके तयार केली आहेत. दिल्ली पोलीस विमानातील सर्व क्रू मेंबर्सना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी बोलावू शकतात. 26 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये ही घटना घडली होती. याबाबत महिलेने केबिन क्रूकडे तक्रार केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नंतर त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. डीजीसीएची कठोर भूमिका नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानेही (DGCA) या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. डीजीसीएने म्हटले आहे की, एअरलाइनकडून अहवाल मागवण्यात आला आहे. दोषींवर कडक कारवाई करणार आहे, एअर इंडियाने क्रूच्या त्रुटी शोधण्यासाठी अंतर्गत चौकशी देखील सुरू केली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की आम्ही क्रूच्या चुकांची चौकशी करण्यासाठी अंतर्गत समिती देखील स्थापन केली आहे. तपास आणि अहवाल प्रक्रियेदरम्यान आम्ही पीडित प्रवासी आणि तिच्या कुटुंबाच्या नियमित संपर्कात आहोत. या घटनेमुळे वृद्ध महिला प्रवाशाला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.
या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे. मद्यधुंद आरोपीने पीडित महिलेवर केवळ लघवीच केली नाही तर तिचा प्रायव्हेट पार्टही दाखवला. आयोगाने एअर इंडियाच्या अध्यक्षांना या प्रकरणात हस्तक्षेप करून कारवाई करण्यास सांगितले आहे. या घटनेचा अहवाल व कारवाईचा अहवाल येत्या ७ दिवसांत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.