Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air India Ticket : एअर इंडियाचा मास्टर प्लॅन! नवीन सुविधेमुळे होणार प्रवास स्वस्त, ‘असं’ करा Ticket Book आणि वाचवा पैसे

मध्य पूर्वेतील म्हणजेच पश्चिम आशियामधील सध्याच्या तणावाचा परिणाम सर्वत्र पसरताना दिसत आहे. या सगळ्यापासून विमान वाहतूक क्षेत्र काही सुटलेलं नाही. त्यामुळे आता विमान वाहतूक क्षेत्रावरही स्पष्टपणे दिसून येत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 02, 2026 | 02:14 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एअर इंडियाचा मास्टर प्लॅन!
  • तिकिटे किती स्वस्त असतील?
  • बिझनेस क्लाससाठीही नवीन नियम
Air India Ticket: मध्य पूर्वेतील म्हणजेच पश्चिम आशियामधील सध्याच्या तणावाचा परिणाम सर्वत्र पसरताना दिसत आहे. या सगळ्यापासून विमान वाहतूक क्षेत्र काही सुटलेलं नाही. त्यामुळे आता विमान वाहतूक क्षेत्रावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. वाढता खर्च आणि घटत्या महसुलाच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडिया प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आपला खर्च कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना स्वस्त तिकिटे उपलब्ध करून देण्यासाठी, एअर इंडिया देशांतर्गत आणि कमी अंतराच्या म्हणजेच २ तासांपेक्षा कमी आंतरराष्ट्रीय उड्डाणांमधील काही घटकांनामध्ये बदल केला आहे. नेमका काय आहे तो बदल ज्यामुळे तिकीटांचे दर कमी होणार आहेत. जाणून घेऊयात सविस्तर

Gas चा भडका! कमर्शियलनंतर आता घरगुती Cylinder च्या दरात मोठी वाढ होणार? जाणून घ्या किती बसणार फटका

तिकिटे किती स्वस्त असतील?

एअर इंडिया देशांतर्गत आणि कमी अंतराच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये जेवण ऐच्छिक ठेवण्याची योजना आखत आहे. सूत्रांनुसार, ही सेवा-विभाजन प्रक्रिया लागू झाल्यावर प्रवाशांना विविध प्रकारचे फायदे मिळू शकतात. याचा सर्वात मोठा परिणाम तिकीट दरांवर होण्याची शक्यता आहे. विमानात मिळणारे जेवण न घेणाऱ्या प्रवाशांच्या तिकीट दरात बराच फरक दिसून येऊ शकतो. ₹250 किंवा त्याहून अधिकची कपात होण्याची शक्यता आहे. हा बदल पुढील एक-दोन महिन्यांत लागू होण्याची शक्यता आहे.

बिझनेस क्लाससाठीही नवीन नियम

एअर इंडिया केवळ इकॉनॉमी क्लासच्याच नव्हे, तर बिझनेस क्लासच्या प्रवाशांचेही पैसे वाचवण्याचे मार्ग शोधत आहे. ही एअरलाइन लाउंजचा वापर तिकिटापासून वेगळा करण्याचाही विचार करत आहे. मेट्रो विमानतळांवरील लाउंज चालक प्रत्येक प्रवाशाकडून सरासरी १,१०० ते १,४०० रुपये आकारतात. अनेक व्यावसायिक प्रवासी थेट विमानाने प्रवास करण्यासाठी विमानतळावर येतात आणि लाउंजचा वापर करत नाहीत. अशा परिस्थितीत, त्यांना लाउंजच्या प्रवेशाशिवाय स्वस्त तिकीट खरेदी करणे अधिक सोपे वाटू शकते.

१५० आंतरराष्ट्रीय उड्डाणे कमी

महागडे ATF आणि काही देशांची बंद हवाई हद्द यामुळे दररोज कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या एअर इंडियाने मे महिन्यात सुमारे १५० आंतरराष्ट्रीय उड्डाणे कमी केली आहेत. ही कपात दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि इतर विमानतळांवरून अमेरिका, कॅनडा आणि युरोपला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या उड्डाणांमध्ये करण्यात आली आहे. एअरलाइनने उड्डाणे पूर्णपणे थांबवलेली नाहीत, परंतु त्यांची वारंवारता कमी केली आहे. पूर्वी जिथे आठवड्यातून ४-५ उड्डाणे असायची, तिथे आता लोड फॅक्टरनुसार १-२ उड्डाणे कमी करण्यात आली आहेत.

एअर इंडिया हे निर्णय का घेत आहे?

२८ फेब्रुवारीपासून विमान इंधनाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन यामुळे विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. भारत ही एक अत्यंत संवेदनशील बाजारपेठ आहे. जेव्हा तिकिटांचे दर खूप वाढतात, तेव्हा लोक हवाई प्रवासाऐवजी रेल्वे किंवा रस्ते प्रवासाला पसंती देतात. वाढलेल्या भाड्यांमुळे प्रवासी गमावण्याची विमान कंपन्यांना इच्छा नसते. जगभरातील अनेक प्रमुख ‘फुल-सर्व्हिस’ एअरलाइन्स आता त्यांच्या सेवांचे विभाजन करत आहेत. अनेक एअरलाइन्स फक्त साधे जेवण देतात आणि विशेष जेवणांसाठी वेगळे शुल्क आकारतात. तज्ञांच्या मते, ‘फुल-सर्व्हिस’ आणि ‘लो-कॉस्ट’ एअरलाइन्स च्यातील फरक झपाट्याने नाहीसा होत आहे.

Petrol-Diesel Price Hike: बोंबला! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार? सरकारच्या एका विधानाने वाहनधारकांमध्ये खळबळ

Web Title: Air india no meal ticket booking discount save money travel cheap marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • air india
  • Air India latest news
  • Aviation
  • Business News
  • dollar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.