Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur FDA Actoin: तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर नागपुरच्या मेयोतील ‘बालाजी’उपहारगृहावर कारवाई; परवाना नसल्याने केले बंद

नागपुरमधील मेयो रुग्णालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या उपहारगृहावर अन्न सुरक्षा विभागाने धडक कारवाई केली आहे. वैध अन्न परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे तपासणीत समोर आले. स्वच्छता, अन्न हाताळणी आणि कचरा व्यवस्थापनातील अनेक त्रुटींमुळे विभागाने उपहारगृह बंद केले असुन आता आवश्यक परवाना आणि त्रुटींची पूर्तता केल्या

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 26, 2026 | 10:39 AM
नागपूर FDA Actoin: तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर नागपुरच्या मेयोतील ‘बालाजी’उपहारगृहावर कारवाई; परवाना नसल्याने केले बंद

नागपूर FDA Actoin: तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर नागपुरच्या मेयोतील ‘बालाजी’उपहारगृहावर कारवाई; परवाना नसल्याने केले बंद

Follow Us
Follow Us:
  • तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर अन्न सुरक्षा विभागाची कारवाई
  • वैध अन्न परवान्याशिवाय सुरू होते उपहारगृह
  • स्वच्छता, अन्न हाताळणी व कचरा व्यवस्थापनात गंभीर त्रुटी
नागपूर : नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरातील श्री बालाजी उपहारगृहावर अन्न सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. वैध अन्न परवाना नसतानाही उपहारगृह सुरू असल्याचे तपासणीत आढळून आल्याने ते बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच स्वच्छता, अन्न हाताळणी, कचरा व्यवस्थापन आणि पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भातही गंभीर त्रुटी आढळल्या.

मेयो परिसरातील या उपहारगृहात महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी चहा, नाश्ता, जेवण तसेच विविध खाद्यपदार्थ तयार करून त्यांची विक्री केली जात होती. मात्र, अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेला वैध परवाना उपहारगृहाकडे नसल्याचे अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान आढळले. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच व्यवसाय सुरू असल्याने विभागाने तत्काळ कारवाई केली.

मदतीचा हात की नराधमांचा सापळा? १९ वर्षीय तरुणीला देहविक्रीच्या दलदलीत ढकलण्याचा प्रयत्न

तपासणीदरम्यान उपहारगृहातील स्वच्छतेची स्थिती समाधानकारक नसल्याचेही निदर्शनास आले. अन्नपदार्थ तयार करताना आणि हाताळताना आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. तसेच उपहारगृहातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक व्यवस्था उपलब्ध नसल्याचे आढळले.
याशिवाय अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतचा तपासणी अहवालही उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यामुळे अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या सर्व त्रुटींची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा विभागाने श्री बालाजी उपहारगृह बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधितांना आवश्यक अन्न परवाना घेणे, कागदपत्रे सादर करणे आणि तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी दूर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अटींची पूर्तता केल्यानंतरच उपहारगृहाबाबत पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

Web Title: Action taken against the balaji canteen at nagpurs mayo hospital following directives from tukaram mundhe shut down due to lack of a license

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • FDA Action
  • Nagpur News
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

Nagpur News : नागपूरचा फ़ुटबाँल , पुढची वाट कुठे ;नागपुरी फ़ुटबाँल चे भविष्य काय ?
1

Nagpur News : नागपूरचा फ़ुटबाँल , पुढची वाट कुठे ;नागपुरी फ़ुटबाँल चे भविष्य काय ?

Nagpur News : जीवाची भीती ,रस्त्यांवर काढली रात्र ;जलशुद्धीकरणात क्लोरीन वायू गळती
2

Nagpur News : जीवाची भीती ,रस्त्यांवर काढली रात्र ;जलशुद्धीकरणात क्लोरीन वायू गळती

Navi Mumbai Crime : एमआयडीसीत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; १५ व्यक्ती व संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
3

Navi Mumbai Crime : एमआयडीसीत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; १५ व्यक्ती व संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

Analogue Paneer Ban : हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी! तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर? कसं ओळखायचं?
4

Analogue Paneer Ban : हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी! तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर? कसं ओळखायचं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.