Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :स्टार एअरकडून नागपूरच्या प्रवाशांना मोठा धक्का ;१२ विमानसेवांवर शहराचा भार

Nagpur News : स्टार एअरच्या १२ विमानसेवांशी संबंधित निर्णयामुळे नागपूरच्या हवाई वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून, प्रवाशांच्या प्रवासाचे नियोजन आणि कनेक्टिव्हिटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 10, 2026 | 03:29 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • या शहरांशी आहे कनेक्टिव्हिटी
  • जीएमआरचेही बळ दिसत नाही
  • कतर एअरवेजची सेवासुद्धा काहीदिवसांसाठी बंद
Nagpur News:नागपूर हे सेंटर असूनही नवीन विमानसेवा सुरू होत नसताना आधीपासून सुरू असलेल्या विमानसेवाही एकापाठोपाठ बंद होत आहेत. आता नागपूर-किशनगड (अजमेर) दरम्यान सुरू असलेली स्टार एअरची विमानसेवाही बंद झाली आहे. किशनगड विमानतळाच्या माध्यमातून अजमेर आणि आसपासच्या भागात पोहोचणाऱ्या नागपूरच्या प्रवाशांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

ही विमानसेवा बंद झाल्याने अजमेरला जाण्यासाठी प्रवाशांसमोर थेट हवाई पर्याय मर्यादित झाले आहेत. अशाप्रकारे सुरू असलेल्या विमानसेवांवर विराम मिळत असल्याने आता उपराजधानी केवळ १२ विमानसेवांवर येऊन ठेपली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टार एअरने किशनगडसाठीची थेट विमानसेवा बंद करून आता नागपूर-पुणे-किशनगड विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नागपूरच्या प्रवाशांना किशनगडला जाण्यासाठी पुण्याला जाऊन तेथून पुढील विमान पकडावे लागणार आहे.

ही गंतव्यस्थाने झाली बंदः नागपूरहून हवाई सेवा देणाऱ्या स्टार एअरकडून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, कालांतराने यातील अनेक सेवा बंद झाल्या. येथून चेन्नई, बेळगावी, औरंगाबाद, नाशिक आणि लखनऊनंतर आता किशनगडची सेवाही बंद झाली आहे.

प्रवाशांचे म्हणणे आहे की, एखाद्या नवीन शहरासाठी विमानसेवा सुरू झाल्याने नागपूरची कनेक्टिव्हिटी मजबूत होण्याची अपेक्षा निर्माण होते. मात्र, काही काळानंतर सेवा बंद झाल्याने प्रवाशांच्या नियोजनावर परिणाम होतो.

Nagpur News : १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात; उत्पादन घटल्याने दर कडाडण्याची शक्यता

या शहरांशी आहे कनेक्टिव्हिटी

नागपूर विमानतळावर सध्या सुमारे १० देशांतर्गत आणि २ आंतरराष्ट्रीय विमानसेवांचे संचालन सुरू आहे. १० देशांतर्गत विमानसेवांमध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, इंदूर, कोलकाता, अहमदाबाद, नांदेड आणि गोवा यांचा समावेश आहे. तर २ आंतरराष्ट्रीय विमानसेवांमध्ये दोहा आणि शारजाह यांचा समावेश आहे. अन्य शहरांमध्ये तसेच परदेशात जाण्यासाठी दिल्ली आणि मुंबई येथून कनेक्टिंग फ्लाइटचा आधार घ्यावा लागतो.

Nagpur Police : डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’

जीएमआरचेही बळ दिसत नाही

नागपूर विमानतळाच्या संचालनाची जबाबदारी जीएमआर समूहाकडे आल्यानंतर विमानतळाच्या सुविधांसोबतच विमानसेवा आणि गंतव्यस्थळांची संख्याही वाढेल, अशी प्रवाशांना अपेक्षा होती. मात्र, नवीन विमानसेवा आणि विविध शहरांसाठी थेट कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत प्रवाशांच्या अपेक्षा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाबाबत निश्चित केलेली डेडलाइनही कुठे हवेतच विरून जाणार नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

कतर एअरवेजची सेवासुद्धा काहीदिवसांसाठी बंद

देशांतर्गत मार्गासोबतच नागपूरच्या आंतरराष्ट्रीय हवाई सेवेलाही मोठा धक्का बसला आहे, कतार एअरवेजने २२ ऑक्टोबर ते २९ मार्च २०२७ या कालावधीत आपली नागपूर-दोहा-नागपूर विमानसेवा तात्पुरती बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

Web Title: Nagpur news major setback for nagpur travelers from star air city burdened with 12 flight servicescp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • flight booking
  • Marathi News
  • Nagpur Airport
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Dashami Marathi Movie: हातात धगधगती ज्योत, डोळ्यांत रौद्र रूप! ‘दशमी’च्या ‘चंडिका हो’ गाण्यात गौरी इंगवलेचा दमदार अवतार
1

Dashami Marathi Movie: हातात धगधगती ज्योत, डोळ्यांत रौद्र रूप! ‘दशमी’च्या ‘चंडिका हो’ गाण्यात गौरी इंगवलेचा दमदार अवतार

Katrina Kaif London look: लंडनमध्ये कतरिना कैफचा जलवा! ट्रोलर्सची बोलती बंद, चाहत्यांनी मात्र केली ‘ही’ खास मागणी
2

Katrina Kaif London look: लंडनमध्ये कतरिना कैफचा जलवा! ट्रोलर्सची बोलती बंद, चाहत्यांनी मात्र केली ‘ही’ खास मागणी

Mr Faisu Wedding Photos: फैजू अडकला लग्न बंधनात, फोटो टाकत चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज
3

Mr Faisu Wedding Photos: फैजू अडकला लग्न बंधनात, फोटो टाकत चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज

Nagpur News : १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात; उत्पादन घटल्याने दर कडाडण्याची शक्यता
4

Nagpur News : १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात; उत्पादन घटल्याने दर कडाडण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.