Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Police :डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’

Nagpur Police : मुंबईच्या धर्तीवर नागपुरात ‘अर्बन पोलिसिंग’ राबवण्याची तयारी. डेटाच्या आधारे १९ निकषांवर पोलिसांची गरज निश्चित करून मनुष्यबळाचे नियोजन केले जाणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 09, 2026 | 04:44 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पात्रतेनुसार जबाबदारी
  • पहाटे ३ ते ५ दरम्यान गस्त वाढणार
  • वाहतूक कोंडीवर ‘इंजिनिअरिंग’चा उपाय
Nagpur Police : शहरातील पोलिसिंग पारंपरिक पद्धतीऐवजी गुन्ह्यांचे प्रमाण, कामाचा ताण आणि गरजेनुसार करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याचा गुन्हेगारी आलेख, प्रतिबंधात्मक कारवाई, आपत्कालीन कॉल, उपलब्ध मनुष्यबळासह १९ निकषांवर स्वतंत्र माहिती संकलित केली आहे.

माहितीच्या आधारे कोणत्या पोलिस ठाण्याला अतिरिक्त मनुष्यबळ, वाहने आणि अन्य साधनसामग्रीची आवश्यकता आहे, हे निश्चित केले जाणार आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गुरुवारी ‘मीट द प्रेस’मध्ये ही माहिती दिली.
सर्व पोलिस ठाण्यांना समान मनुष्यबळ देण्याऐवजी प्रत्यक्ष कामाचा भार लक्षात घेऊन संसाधनांचे वाटप करण्यावर भर दिला जाणार असल्याचे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.

उदाहरणार्थ, हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११२ क्रमांकावर दरमहा सुमारे ६८३ आपत्कालीन कॉल येतात तर बजाजनगर पोलिस ठाण्यात ही संख्या सुमारे ११० आहे. त्यामुळे दोन्ही ठाण्यांना समान मनुष्यबळ देणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी सांगितले.नागपूरची भौगोलिक रचना आणि गुन्ह्यांचे स्वरूप लक्षात घेऊन शहरी पोलिसिंगची पुनर्रचना केली जात आहे.

मुंबईच्या धर्तीवर पोलिस ठाण्यातील विविध जबाबदाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक, द्वितीय पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षक स्तरावर विभागण्याची योजना आहे. दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यावर भर पोक्सो आणि मोटार वाहन कायद्याच्या प्रकरणांत दोषसिद्धीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. मात्र, इतर गंभीर गुन्ह्यांमध्येही दोषसिद्धीचे प्रमाण वाढवणे हे पोलिसांचे प्राधान्य असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले. यासाठी दोषसिद्धीची शक्यता अधिक असलेली प्रकरणे निश्चित करून तपासाची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जात आहे.

Nagpur News : पाण्यासाठी हाहाकार ;मनपा बेफिकीर

पात्रतेनुसार जबाबदारी

पोलिस कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य लक्षात घेऊन जबाबदारी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेत वाणिज्य शाखेची पार्श्वभूमी असलेल्या कर्मचाऱ्यांना तर सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी संगणकशास्त्र आणि बीसीए शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे, संबंधित क्षेत्रात सातत्याने काम करून कर्मचाऱ्यांना त्या विषयातील तज्ज्ञ बनविण्यावर भर राहणार आहे. महिला सुरक्षेसाठी महिला अधिका-यांच्या नेतृत्वाखाली १२ निर्भया पथके कार्यरत केली आहेत. गरजेनुसार गर्दीच्या पोलिस ठाण्यांना अतिरिक्त मनुष्यबळ देण्याचीही योजना आहे.

पहाटे ३ ते ५ दरम्यान गस्त वाढणार

घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांच्या विश्लेषणातून पहाटे ३ ते ५ या वेळेत गुन्हेगार अधिक सक्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कालावधीत पोलिसांची गस्त अधिक प्रभावी केली जाणार आहे. निवासी भागात पोलिस सहायता गट तयार करून स्थानिक सुरक्षा रक्षकांनाही या व्यवस्थेशी जोडले जाणार आहे.

पोलिस ठाण्याच्या पातळीवर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसोबत गुन्हे पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून गस्त आणि तपाच अधिक सक्षम करण्याची योजना आहे. बीट पोलिसिंग मजबूत करण्यासाठी शहरातील १३० गस्ती पथकांवर मोबाईल ट्रॅकिंग उपकरणे बसवण्यात येत आहेत. त्यामुळे गस्ती पथकांच्या हालचाली आणि संबंधित भागात पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती यावर लक्ष ठेवता येणार आहे.

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…

वाहतूक कोंडीवर ‘इंजिनिअरिंग’चा उपाय

शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर केवळ पोलिस कारवाई हा उपाय नसल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले, वाहतूक अभियंते, वास्तुविशारद आणि नगररचना तज्ज्ञांच्या मदतीने शहरातील वाहतूक व्यवस्थेचा शास्त्रीय अभ्यास करून सर्वकष वाहतूक आराखडा तयार करण्याची गरज आहे.

नाशिकमध्ये कार्यरत असताना अशा पद्धतीचा प्रयोग केल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरातही सिग्नलच्या समन्वयावर काम सुरू आहे. सर्व सिग्नलमध्ये योग्य समन्वय साधल्यास वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक प्रभावी कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Nagpur police police force strength to be determined based on data urban policing model to be adopted similar to mumbaicp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur News
  • Nagpur Police

संबंधित बातम्या

Entertainment News: न्यायासाठीचा संघर्ष, महिलांची नजर! ‘दायरा’ ते ‘पूजा मेरी जान’ काय सांगतात या कथा?
1

Entertainment News: न्यायासाठीचा संघर्ष, महिलांची नजर! ‘दायरा’ ते ‘पूजा मेरी जान’ काय सांगतात या कथा?

Nagpur News : पाण्यासाठी हाहाकार ;मनपा बेफिकीर
2

Nagpur News : पाण्यासाठी हाहाकार ;मनपा बेफिकीर

Ahilyanagar News: केंद्रीय पथक थेट बांधावर; अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
3

Ahilyanagar News: केंद्रीय पथक थेट बांधावर; अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई
4

Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.