Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी अन् लेझर लाईट वापरु नका, नाहीतर…; शिक्रापूर पोलीसांचा इशारा

विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बी वा लेझर लाईटचा वापर झाल्यास संबंधित गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असं शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 04, 2025 | 04:44 PM
गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी अन् लेझर लाईट वापरु नका, नाहीतर...; शिक्रापूर पोलीसांचा इशारा

गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी अन् लेझर लाईट वापरु नका, नाहीतर...; शिक्रापूर पोलीसांचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : गणेशोत्सवाचे दिवस उत्साह, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचे द्योतक मानले जातात. मात्र, विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे, डॉल्बी व लेझर लाईटच्या वाढत्या वापरामुळे ध्वनीप्रदूषण, अराजकता आणि अनुशासनभंगाचे प्रकार वाढत असल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे की, विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बी वा लेझर लाईटचा वापर झाल्यास संबंधित गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

पोलिसांचे सर्व मंडळांना आवाहन

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत एकूण ३५ गावांमध्ये तब्बल २४६ गणेश मंडळे कार्यरत आहेत. याशिवाय काही कंपन्या आणि खाजगी सोसायट्यांमध्येही गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाच्या विसर्जनासाठी अनेक मंडळांनी मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले आहे. सर्व मंडळांनी विसर्जन मिरवणुकीचे ठिकाण, वेळ व नियोजनाची माहिती पोलीस स्टेशनमध्ये सादर केली आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गावागावांत जाऊन मंडळांना भेट देत आहेत. या वेळी त्यांनी मिरवणुका विहित वेळेत, शांततेत व नियमांचे पालन करून पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पारंपारिक वाद्यांनाच प्राधान्य

पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले की, विसर्जन मिरवणुकीत फक्त पारंपारिक वाद्यांचा वापर करावा, लेझर लाईट वा डॉल्बीच्या जोरदार आवाजाने वातावरण बिघडवू नये. परंपरागत लेझीम, ढोल-ताशा, टाळ-मृदुंग यासारख्या वाद्यांमुळे गणेशोत्सवाची खरी ओळख जपली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

कायदेशीर कारवाईचा इशारा

“गणेशोत्सव हा भक्ती आणि श्रद्धेचा उत्सव आहे. त्यामध्ये डीजे, डॉल्बी वा लेझर लाईटचा वापर अजिबात सहन केला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असा ठाम इशारा गायकवाड यांनी दिला आहे.

पुणे पोलीसही सज्ज

देशभरात यंदा गणपती मिरवणूकांचा जल्लोष पहायला मिळणार असून 6 सप्टेंबर रोजी शनिवारी गावोगावी आणि घरोघरी बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला जाईल .पुण्याच्या पारंपरिक गणपती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे . मानाच्या पाच गणपती बाप्पासह इतर गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे . पुण्यात विसर्जनादिवशी होणाऱ्या गर्दीच्या पाश्वभूमीवर यंदा विसर्जनाच्या वेळा प्रशासनानं ठरवून दिल्या आहेत. पुण्यातील गणेशोत्सवाचा उत्कर्षबिंदू असलेली विसर्जन मिरवणूक यंदा ठरावीक वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांना नियमावली कळवण्यात आली असून यंदा शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने मिरवणूक पार पडावी यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

Web Title: Action will be taken against those using dolby and laser lights in ganesh visarjan procession

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • pune news
  • Shikrapur Crime
  • Shikrapur Police

संबंधित बातम्या

Pune News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; सलग ४१ तास अखंड…
1

Pune News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; सलग ४१ तास अखंड…

Teachers Day: “शिक्षण हे ये हृदयीचे ते हृदयी पोहोचले पाहिजे”
2

Teachers Day: “शिक्षण हे ये हृदयीचे ते हृदयी पोहोचले पाहिजे”

‘गुरुजी’ अडकले हनीट्रॅपमध्ये; महिलेने आधी नग्न होऊन व्हिडिओ कॉल केला, नंतर शिक्षकानेही कपडे काढले…
3

‘गुरुजी’ अडकले हनीट्रॅपमध्ये; महिलेने आधी नग्न होऊन व्हिडिओ कॉल केला, नंतर शिक्षकानेही कपडे काढले…

Ganesh Visarjan 2025 : गणरायाच्या निरोपासाठी शानदार तयारी; विसर्जनासाठी मानाच्या गणपतीसह इतर मंडळेही सज्ज
4

Ganesh Visarjan 2025 : गणरायाच्या निरोपासाठी शानदार तयारी; विसर्जनासाठी मानाच्या गणपतीसह इतर मंडळेही सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.