Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडगाव शेरीतील राड्यात नवा ट्विस्ट; “मार खाणारा तो पठारे मी नव्हे” ॲड. सचिन पठारे यांचे स्पष्टीकरण

Pune News : वडगाव शेरी प्रकरणात ॲड. सचिन पठारे यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं आहे. मार खालेला व्यक्ती ते नसल्याचे त्यांनी माध्यमांसमोर सांगितले.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 08, 2025 | 04:16 PM
Adv. Sachin Pathare reacts to the media in the case of assault on Vadgaon Sheri MLA Bapu Pathare

Adv. Sachin Pathare reacts to the media in the case of assault on Vadgaon Sheri MLA Bapu Pathare

Follow Us
Close
Follow Us:

Pune Crime News : पुणे : अक्षय फाटक : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राड्याला आता नवा नाट्यमय ट्विस्ट मिळालाय. या प्रकरणात आमदार बापू पठारे आणि त्यांच्या समर्थकांना झालेल्या धक्काबुक्कीची चर्चा रंगली असताना, “मार खाणारा सचिन पठारे मी नाही” असं म्हणत ॲड. सचिन पठारे यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं आहे.

शनिवारी (दि.04) लोहगाव येथील गाथा लॉन्समध्ये आमदार बापू पठारे एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमादरम्यान त्यांचं आणि बंडू खांदवे यांच्या बोलण्याचे शाब्दिक चकमकीत रूपांतर झाले. या वादानंतर दोन्ही गटातील समर्थकांमध्ये गोंधळ उडाला आणि काहींना मारहाण झाल्याची माहिती मिळाली. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी बंडू खांदवे यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या राड्यात ‘सचिन पठारे’ नावाच्या तरुणाला मारहाण झाली असल्याचं वृत्त आल्यानंतर, त्याच नावाचा दुसरा तरुण  ॲड. सचिन पठारे हा चर्चेत आला. मात्र त्यांनी स्पष्ट केलं की, “मार खाणारा सचिन पठारे मी नाही. माझं या घटनेशी काहीही संबंध नाही. नामसाधर्म्यामुळे अनेक जण मला फोन करून विचारपूस करत आहेत, ज्यामुळे मला मानसिक त्रास होत आहे.” असे ॲड. सचिन पठारे यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

ॲड. पठारे हे भाजपचे कार्यकर्ते असून पूर्वी आमदार बापू पठारे यांचे समर्थक होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. ते म्हणाले, “मी आगामी महानगरपालिका निवडणुका लढविण्याची तयारी करत आहे. मात्र या घटनेमुळे माझी विनाकारण बदनामी झाली आहे. याचा माझ्या प्रतिमेवर परिणाम होत आहे.” तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, “आता माझे आणि बापू पठारे यांचे कोणतेही संबंध नाहीत. या घटनेत माझं नाव जोडणं चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे.” अशी भूमिका पठारे यांनी व्यक्त केली आहे.

या साऱ्या घडामोडींमुळे वडगाव शेरी मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा चांगलंच तापलं असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राडा नक्की कोणत्या दिशेने वळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पोलिसांवर प्राणघातक हल्ला

पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ड्युटी संपवून घरी जात असताना पोलिसांवर कोयत्याने वार केला आहे. ही घटना लॉ कॉलेज रोडवर काल रात्री १ वाजताच्या सुमारास घडली आहे. आता पुन्हा पोलिसचं असुरक्षित आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ड्युटी संपवून घरी जात असतांना लॉ कॉलेजरोडवर बाईक वरून जाणाऱ्या दोघांनी गुन्हे शाखा युनिट युनीट-3 मध्ये काम करणाऱ्या अमोल काटकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. प्राथमिक माहितीनुसार कट मारल्याच्या वादात हा प्रकार घडला आहे. या घटनेत काटकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोयता हल्ला करणाऱ्यांना पोलीस शोध घेत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही घटना रात्री एक वाजताच्या सुमारास घडली आहे.

Web Title: Adv sachin pathare reacts to the media in the case of assault on vadgaon sheri mla bapu pathare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 04:13 PM

Topics:  

  • crime news
  • pune crime case
  • pune news

संबंधित बातम्या

मोखाडा पोलिसांची तडफदार कारवाई! अवघ्या 12 तासांच्या आत खूनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक
1

मोखाडा पोलिसांची तडफदार कारवाई! अवघ्या 12 तासांच्या आत खूनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक

कारागृहातच कैद्याची आत्महत्या; लोखंडी गजाला जोरदार धडक दिली अन् जखमी होताच…
2

कारागृहातच कैद्याची आत्महत्या; लोखंडी गजाला जोरदार धडक दिली अन् जखमी होताच…

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!
3

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!

African snail In Pune : आफ्रिकन गोगलगायींचा पुण्यात प्रादुर्भाव; शहरी परिसंस्थेसाठी ठरतीये धोक्याची घंटा!
4

African snail In Pune : आफ्रिकन गोगलगायींचा पुण्यात प्रादुर्भाव; शहरी परिसंस्थेसाठी ठरतीये धोक्याची घंटा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.