crime (फोटो सौजन्य: social media)
नागपूर : नागपूर मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अफगाणिस्तानच्या एका व्यापाऱ्यावर दहशतवादी असल्याच्या आरोप करत जीवघेणा मारहाण केल्याचं समोर आलं आहे. ही घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यादव नगर भागात घडली आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव फहीम खान मामातुर मर्जक ( वय 46 वर्ष) असं आहे.
Junnar Accident: पीकअप जीपची मोटारसायकलला भीषण धडक; पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी
नेमकं काय प्रकरण?
२७ जुलै, रविवारी रात्री एका ओळखीच्या व्यक्तीसोबत एका कारमधून एका ग्राहकाकडे फ्रिज बघायला गेले होते. रात्री पावणेबाराच्या दरम्यान ते कारने परत जायला निघताना पार्किंगजवळ एका तरुणाने त्यांना गाठले. त्या तरुणाने फहीम यांना ‘तू दहशतवादी आहेस आणि इथे यायचे नाही,’ असे म्हटले. फहीम यांनी त्यावर ते कपडा व्यापारी असल्याचे सांगितले. मात्र, तरुणाने त्यांना धमकावले. त्यानंतर काही न बोलताच फहीम यांना मारायला सुरुवात केली. फहीम यांच्या साथीदारांनी त्या तरुणाला थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र अन्य दोन आरोपी दुचाकीने तेथे पोहोचले. त्यांनी देखील फहीम यांना मारहाण सुरू केली.
गुन्हा दाखल
पहिल्या आरोपीने सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने फहीम यांच्या डोक्यावर प्रहार केले. यात फहीम गंभीर जखमी झाले. त्यानंतर फहीम यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून हल्ला करणाऱ्या अजय चव्हाण (30), ऋषी (20) व मयंक (19) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळचे अफगाणिस्तानचे
फहीम खान मामातुर मर्जक हे मूळचे अफगाणिस्तान येथील निवासी आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरच्या मोठा ताजबाग परिसरात सरताज कॉलनीत राहत आहे. ते शहरात फिरून ब्लँकेट विकतात.
संतापजनक ! प्रेमसंबंधाला प्रेयसीच्या घरच्यांचा विरोध; पोलिसांना घेऊन घरी आला प्रियकर आणि कुटुंबियांना…..
दरम्यान, नागपूरमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून प्रियकर पोलीस कर्मचारी व अन्य दोघांसह घरात शिरला आणि प्रेयसीच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही घटना लखडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रेयसीच्या आईला मारहाण करीत तिचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय प्रकरण?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लकडगंज भागात राहणारी तरुणी मिहानमधील एका कंपनीत काम करते. याच कंपनीत तिचा प्रियकर अदनान काम करत होता. रविवारी सकाळी दोघेही गोरेवाडा परिसरात फिरायला गेले. दुपारी अदनान याने प्रेयसीला घरी सोडले. याबाबत तरुणीच्या आईला समजले. सायंकाळी तिचा पती व मुलगा घरी आले. या दोघांना तरुणीच्या आईने याबाबत माहिती दिली. कुटुंबीयांनी मुलीला फटकारले. दरम्यान रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तरुणीने अदनानच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्याला सांगितले की ‘कुटुंबीय मारहाण करीत आहेत, मला येथून घेऊन जा’ अशी ती म्हणाली.
त्यानंतर अदनान तीन साथीदारांसह लाकडगंजमध्ये आला. अदनानसह चौघे घरात घुसले. तरुणीच्या आईने विरोध केला तेव्हा अदनाने विनयभंग करीत तरुणीच्या आईला मारहाण केली. आईने आरडाओरड केल्याने नागरिक जमले. त्यांनी अदनानला मारहाण करायला सुरुवात केली. अन्य तिघे तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी अदनानला अटक केली. त्यानंतर अन्य तिघांना अटक करण्यात आली.
धक्कादायक! ९० हजारांत घेतलेले बाळ ३५ लाखाला विकलं, सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश