Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आणखी एका निळ्या ड्रमात मृत्यदेह…! दोरीने पाय अन् मान बांधली, मेरठ नंतर आता लुधियानात आढळला पुरुषाचा मृतदेह

Ludhiana Drum Murder Case: पंजाबमधील लुधियाना येथील शेरपूर भागात निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मृतदेहाचे हात आणि पाय दोरीने बांधलेले होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 27, 2025 | 03:15 PM
दोरीने पाय अन् मान बांधली, निळ्या ड्रममधून प्रचंड दुर्गंधी..., मेरठनंतर लुधियानामध्ये धक्कादायक घटना समोर (फोटो सौजन्य-X)

दोरीने पाय अन् मान बांधली, निळ्या ड्रममधून प्रचंड दुर्गंधी..., मेरठनंतर लुधियानामध्ये धक्कादायक घटना समोर (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Ludhiana Drum Murder Case in Marathi: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये महिलेनं प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली होती. आरोपी महिला एवढ्यावरच थांबली नाही तर तिने पतीचा मृतदेह एका निळ्या ड्रममध्ये टाकून त्यात सिमेंट भरलं होतं. या हत्याकांडांने संपूर्ण देश हादरून गेला होता. ही घटना ताजी असताना पंजाबमधील लुधियाना येथील शेरपूर भागात निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली. मृतदेहाचे हात आणि पाय दोरीने बांधलेले होते, त्यामुळे पोलिसांना हत्येचा संशय आहे. निळ्या ड्रममधून प्रचंड दुर्गंधी येत असल्याची तक्रार केल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर हा भयानक खुलासा झाला.

बांगलादेशी महिलेने मिळविला भारतीय पासपोर्ट; पोलिसांनी छापा टाकला अन्…

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात गुंडाळून ड्रममध्ये बंद करण्यात आला होता. ड्रम रिकाम्या जागेत पडला होता आणि त्याची स्थिती पाहता तो अनेक दिवसांपासून तिथेच होता असे दिसून येते. ठाणे विभाग क्रमांक ६ च्या एसएचओ कुलवंत कौर यांनी सांगितले की, मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही आणि मृत व्यक्ती स्थलांतरित असण्याची शक्यता आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे, त्यानंतर मृत्यूचे कारण कळेल.

सीसीटीव्ही फुटेजवरून आशा

पोलिसांच्या तपासात हे ड्रम नवीन असल्याचे समोर आले आहे की ज्यामुळे हत्येचे नियोजन आधीच करण्यात आले होते असा संशय आणखी वाढतो. ड्रमचा स्रोत शोधण्यासाठी पोलिसांनी लुधियानामधील ४२ ड्रम उत्पादक कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे. याशिवाय, ड्रम कधी आणि कसा आणला गेला हे शोधण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील स्कॅन केले जात आहे.

मेरठमध्येही अशीच एक घटना

ही घटना काही काळापूर्वी मेरठमध्ये घडलेल्या ब्लू ड्रम हत्याकांडाची आठवण करून देते. जिथे एका महिलेने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केली आणि मृतदेह निळ्या ड्रममध्ये लपवला. लुधियाना पोलिस हे प्रकरण देखील अशाच कटाचा भाग आहे का याचा तपास करत आहेत.

हत्येचे गूढ उकलण्यात पोलीस गुंतले

या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की शेरपूरसारख्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित लोक राहतात आणि अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि हे हत्येचे गूढ लवकरात लवकर उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुण्यात तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; बंदूक दाखवून धमकी दिली अन्…

Web Title: After meeruth ludhiana drum case revealed body found in blue drum crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 03:11 PM

Topics:  

  • crime
  • police
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

पनवेल बालसुधारगृहातून पाच मुली पळाल्या; लोखंडी ग्रिल कापले, पाण्याच्या टाकीवर चढल्या आणि पाईपने उतरल्या …
1

पनवेल बालसुधारगृहातून पाच मुली पळाल्या; लोखंडी ग्रिल कापले, पाण्याच्या टाकीवर चढल्या आणि पाईपने उतरल्या …

Navi Mumbai Crime : ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
2

Navi Mumbai Crime : ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : कोपरखैरणेत घरात घुसून पावणे बारा लाखांची चोरी; लक्ष्मी हार, ब्रेसलेट, नेकलेस अन् मंगळसूत्र चोरीला
3

Navi Mumbai Crime : कोपरखैरणेत घरात घुसून पावणे बारा लाखांची चोरी; लक्ष्मी हार, ब्रेसलेट, नेकलेस अन् मंगळसूत्र चोरीला

Pune Crime: पुण्यातील कोथरूडमध्ये गुंडांचा हैदोस, दोन दिवसांपूर्वी गोळीबार तर हातात पिस्तुल घेवून राडा !
4

Pune Crime: पुण्यातील कोथरूडमध्ये गुंडांचा हैदोस, दोन दिवसांपूर्वी गोळीबार तर हातात पिस्तुल घेवून राडा !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.