Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुगेवाडी दारूकांडानंतर पोलीस अन् उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडवर; समन्वय बैठकीत घेतला मोठा निर्णय

पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण परिसरातील अवैध दारू धंद्यांचे नेटवर्क पूर्णपणे उखडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क आणि अन्न व औषध प्रशासन विभाग आता अधिक आक्रमक झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 06, 2026 | 02:53 PM
फुगेवाडी दारूकांडानंतर पोलीस अन् उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडवर; समन्वय बैठकीत घेतला मोठा निर्णय

फुगेवाडी दारूकांडानंतर पोलीस अन् उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडवर; समन्वय बैठकीत घेतला मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण परिसरातील अवैध दारू धंद्यांचे नेटवर्क पूर्णपणे उखडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क आणि अन्न व औषध प्रशासन विभाग आता अधिक आक्रमक झाले आहेत. या संपूर्ण परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली उच्चस्तरीय समन्वय बैठक पार पडली. “अवैध दारूच्या साखळीतील प्रत्येक दुव्यावर आता संयुक्त प्रहार…” या मुख्य संकल्पनेभोवती या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 

या महत्त्वपूर्ण बैठकीला पुणे जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी एकत्र आले होते. यामध्ये पिंपरी-चिंचवडचे पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली (प्रादेशिक विभाग), पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे, तसेच अन्न व औषध प्रशासन (FDA) पुणे विभागाचे सह आयुक्त गिरीष हुकरे उपस्थित होते. याशिवाय पुणे शहराचे पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-४) चिलूमूल्ला रजनीकांत आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस उप आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांनीही या बैठकीत सक्रिय सहभाग घेतला.

या समन्वय बैठकीत प्रामुख्याने भेसळयुक्त दारूची निर्मिती, अवैध दारू गाळणे (हातभट्टी) आणि बेकायदेशीर दारू विक्रीच्या छुप्या जाळ्याविरुद्ध कठोर पावले उचलण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. या अवैध धंद्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी विविध विभागांमध्ये अत्यंत संवेदनशील आणि गुप्त माहितीची तातडीने देवाणघेवाण करणे आणि सर्व यंत्रणांच्या समन्वयाने अधिक प्रभावी व मजबूत अंमलबजावणी करणे यावर एकमत झाले.

हे सुद्धा वाचा : चिंचवडच्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंची विक्री? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळयुक्त दारू उत्पादकांवर आणि हातभट्ट्यांवर केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर सर्व विभागांच्या संयुक्त पथकांद्वारे थेट छापे टाकले जाणार आहेत. अवैध दारू साखळीतील मुख्य सूत्रधार, कच्चे रसायन पुरवणारे आणि वाहतूक करणाऱ्यांवरही मोक्का किंवा तत्सम कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या मोहिमेची अधिकृत माहिती दिली आहे.

Web Title: After the phugewadi poisonous liquor incident the police and excise department have taken a big decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pimpri Chinchwad
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; उप अग्निशमन अधिकारी चिपाडेंवर निलंबनाची टांगती तलवार
1

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; उप अग्निशमन अधिकारी चिपाडेंवर निलंबनाची टांगती तलवार

घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार
2

घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार

भीमाशंकर मार्ग पहिल्याच पावसात उखडला, साडेतीन कोटी रुपये खर्चुनही रस्त्याची दुरवस्था; अधिकाऱ्यांवर आरोप
3

भीमाशंकर मार्ग पहिल्याच पावसात उखडला, साडेतीन कोटी रुपये खर्चुनही रस्त्याची दुरवस्था; अधिकाऱ्यांवर आरोप

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांचा दिल्ली दौरा; केंद्र सरकारकडे केला महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा
4

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांचा दिल्ली दौरा; केंद्र सरकारकडे केला महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.