Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Crime: जामखेडमध्ये नर्तिकेची आत्महत्या, भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये नर्तिका दीपाली पाटील (35) हिने साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड दबाव टाकत असल्याचा आरोप; पोलिसांनी अटक. रोहित पवारांनी सखोल तपासाची मागणी.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 06, 2025 | 08:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • जामखेडमधील साई लॉजमध्ये नर्तिका दीपाली पाटीलची आत्महत्या.
  • लग्नासाठी दबाव टाकल्याप्रकरणी संदीप गायकवाडवर गुन्हा नोंद व अटक.
  • रोहित पवारांनी CCTV तपास व प्रकरण दडपण्यास विरोध केला
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडामध्ये कला केंद्रात नाचणाऱ्या एका नर्तिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दीपाली गोकुळ पाटील (वय 35) असे या नर्तिकेचे नाव आहे. तिने शुक्रवारी खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपाली ही मूळची कल्याण येथील रहिवासी आहे. ती जामखेडमध्ये तपनेश्वर भागात आपल्या मैत्रिणींसोबत राहत होती. याप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे.

Cyber Crime : भारतामध्ये २६५ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद, दर मिनिटाला ५०५ डिटेक्‍शन्‍स

आत्महत्या करण्यामागचं कारण काय?

प्राथिम तपासात, भाजपचा माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड हा दीपाली पाटील हिच्या मागे लग्न करण्यासाठी लागला होता. तो तिच्यावर सतत दबाव आणत होता. याच दबावापोटी दीपाली पाटील हिने आत्महत्या केली अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटकही केली आहे.

काय घडलं नेमकं?

दीपाली पाटील ही सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून ती घराबाहेर पडली. परंतु ती बराच वेळ होऊन परत आली नसल्याने तिच्या मैत्रिणींनी शोधाशोध सुरु केली. दीपाली ज्या रिक्षाने गेली त्या चालकांकडून चौकशी केली तेव्हा त्याने तिला लॉज येथे सोडल्याचे सांगितले. तिच्या मैत्रिणी सायंकाळी लाऊंजमध्ये पोहोचल्या असता रूम आतमधून लॉक होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. दिपालीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केले प्रश्न?

याप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. रोहित पवार म्हणाले, जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमच आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना कुणाचा आश्रय मिळतो हे आता लपून राहिलं नाही. अशातच जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटील (३५) यांनी एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची बातमी आली. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं? त्याचे काय संबंध आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा वरदहस्त आहे? आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी. यातून अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत. संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. असेही आमदार रोहित पवार म्हणाले.

जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमच आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना कुणाचा आश्रय मिळतो हे आता लपून राहिलं नाही. अशातच जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटील (३५) यांनी एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची बातमी आली. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं? त्याचे… — Rohit Pawar (@RRPSpeaks) December 5, 2025

Crime News: धारदार शस्त्राच्या धाकाने दुचाकीस्वार महिलेला लुटले; ३ लाख ७० हजारांचे दागिने लंपास

💡

Frequently Asked Questions

  • Que: दीपाली पाटीलने आत्महत्या कुठे केली?

    Ans: साई लॉज, खर्डा रोड, जामखेड येथे पंख्याला गळफास घेऊन.

  • Que: आरोपी कोण व आरोप काय?

    Ans: भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड; लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोप.

  • Que: रोहित पवारांनी काय मागणी केली?

    Ans: CCTV तपास, गुन्ह्याची सखोल चौकशी व आरोपीला संरक्षण मिळू नये याची हमी.

Web Title: Ahilyanagar crime dancer commits suicide in jamkhed former bjp corporator sandeep gaikwad arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: दिल्ली बॉम्बस्फोटाच्या धमकीने माजी महापालिका अधिकाऱ्याला १६ लाखांचा गंडा; ATS–NIA नावाखाली सायबर फसवणूक
1

Mumbai Crime: दिल्ली बॉम्बस्फोटाच्या धमकीने माजी महापालिका अधिकाऱ्याला १६ लाखांचा गंडा; ATS–NIA नावाखाली सायबर फसवणूक

Buldhana: लाडक्या बहीण योजनेच्या पैशांवर डल्ला! पत्नी माहेरी गेली अन् नवऱ्याने दुसरीच ‘बायको’ बँकेत उभी केली;
2

Buldhana: लाडक्या बहीण योजनेच्या पैशांवर डल्ला! पत्नी माहेरी गेली अन् नवऱ्याने दुसरीच ‘बायको’ बँकेत उभी केली;

Wardha Crime: मानसिक रुग्णाचा नग्नावस्थेत तांडव; दंडुक्याच्या हल्ल्यात दोन ठार, पोलिसासह चौघे जखमी
3

Wardha Crime: मानसिक रुग्णाचा नग्नावस्थेत तांडव; दंडुक्याच्या हल्ल्यात दोन ठार, पोलिसासह चौघे जखमी

Gadchiroli Crime: मित्रानेच केला घात! सोन्याच्या चैनसाठी आरडी एजंटची दारू पाजून सत्तूरने निर्घृण हत्या; आधी दारू पाजली, नंतर…
4

Gadchiroli Crime: मित्रानेच केला घात! सोन्याच्या चैनसाठी आरडी एजंटची दारू पाजून सत्तूरने निर्घृण हत्या; आधी दारू पाजली, नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.