दुचाकीस्वार महिलेला लुटले (फोटो- istockphoto)
या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात रूपाली किशोर रुपनवर (रा. रुई, बारामती) या महिलेने फिर्याद दिली. फिर्यादी रूपनवर यांची वंजारवाडीतील जगदंबानगर परिसरात तन्वी फुटस नावाची कंपनी आहे. तिकडे त्या स्कूटीवरून निघाल्या होत्या. पालखी महामार्गावरील पुलाजवळ त्या आल्या असताना, पाठीमागून अज्ञात दोन व्यक्ती एका दुचाकीवरून आले. त्यांनी दुचाकी आडवी मारत फिर्यादीला गाडी थांबवायला भाग पाडले, पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने गाडीवरून खाली उतरत फिर्यादी महिलेच्या स्कूटीची चावी काढून घेतली.
तसेच स्कूटीच्या सीटवर धारदार शस्त्राने वार केले. महिलेला धाक दाखवला. बांगड्या व अंगठी न दिल्यास जीवे मारू, अशी धमकी दिली.फिर्यादीने शस्त्राला घाबरून सोन्याच्या बांगड्या व अंगठी काढून दिली. त्यानंतर ते पालखी महामार्गावरून पाटसच्या बाजूने सुसाट निघून गेले. या घटनेत फिर्यादीकडील ३ लाख ४२ हजार रुपये किमतीच्या ३८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या व २७हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून नेण्यात आली. अधिक तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.
भर दिवसा पालखी महामार्गावर अशा प्रकारे झालेल्या प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी देखील या महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. भर दिवसा देखील असे प्रकार घडल्याने दिवसा देखील महिलांनी या महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे ठरू लागले आहे. महामार्ग पोलिसांनी दिवसा व रात्रीच्या वेळी या पालखी महामार्गावर गस्त वाढवावी, तसेच विविध ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.
बारामतीतील बंटी- बबलीने अनेकांना घातला कोट्यावधींचा गंडा
बारामती शहरात बाहेरून आलेल्या एका बंटी बबली या जोडीने एका इलेक्ट्रिक बाइक कंपनीची सुरुवात करून या कंपनीची फ्रॅंचाईजी विविध भागांमध्ये देण्यासाठी प्रत्येकी १६ लाख असे कोट्यावधी रुपये गोळा करून ही जोडी सध्या गायब झाली आहे. त्यामुळे आयुष्याची पुंजी गोळा करून या जोडीकडे गुंतवणूक केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.






