भारतामध्ये २६५ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद, दर मिनिटाला ५०५ डिटेक्शन्स
ऑनलाइन आर्थिक फसवणूक यासारखी गुन्हेगारी सायबर क्राईम
भारतात तब्बल २६५.५२ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद
सेक्यूराइट लॅब्सने ८ दशलक्षहून अधिक एंडपॉइण्ट्सचे विश्लेषण
मुंबई : वैयक्तिक माहिती चोरणे, फसवणूक, हॅकिंग, रॅन्समवेअर हल्ले, ओळख चोरी आणि ऑनलाइन आर्थिक फसवणूक यासारखी गुन्हेगारी म्हणजे सायबर क्राईम म्हणतात. या गुन्ह्यांमुळे आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेचे नुकसान आणि रेकॉर्ड नष्ट होऊ शकतात आणि त्यांच्याशी लढण्यासाठी जागरूकता, सुधारित सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांचा अहवाल देणे आवश्यक आहे. याचदरम्यान जागतिक सायबरसुरक्षा सोल्यूशन्स प्रदाता क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडची उद्योग शाखा सेक्यूराइटने इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२६ प्रकाशित केला असून अहवालानुसार भारतात तब्बल २६५.५२ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र हादरला! 55 वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार; पोलिसांनी आरोपीला…
ऑक्टोबर २०२४ आणि सप्टेंबर २०२५ दरम्यान सेक्यूराइट लॅब्सने ८ दशलक्षहून अधिक एंडपॉइण्ट्सचे विश्लेषण केले आणि २६५.५२ दशलक्ष डिटेक्शन्सची नोंद केली. हे प्रमाण दैनंदिन ७,२७,००० हून अधिक डिटेक्शन्स आणि दर मिनिटाला ५०५ डिटेक्शन्स इतके आहे. या परिसंस्थेमध्ये ट्रोजन्स व फाइल इन्फेक्टर्सचे प्रमाण सर्वाधिक आहे, जेथे ८.४ दशलक्ष ट्रोजन डिटेक्शन्स आणि ७१.१ दशलक्ष फाइल इन्फेक्टर डिटेक्शन्सची नोंद करण्यात आली. भारतातील कंपन्यांवर झालेल्या एकूण हल्ल्यांपैकी एकत्रित त्यांचे ७० टक्के प्रमाण आहे.
नेक्स्ट जनेरशन अॅण्टीव्हायरस (एनजीएव्ही) आणि अॅण्टी रॅन्समवेअर (एआरडब्ल्यू) इंजिन्सनी ३४ दशलक्षहून अधिक असामान्य क्रियाकलापांना ओळखले. जानेवारी २०२५ मध्ये १८५ घटना आणि ११३,००० डिटेक्शन्ससह रॅन्समवेअर क्रियाकलाप सर्वोच्च होते. क्रिप्टोजॅकिंग डिटेक्शन्स ६.५ दशलक्षपर्यंत पोहोचले. नेटवर्क-आधारित घटना ९.२ दशलक्षपर्यंत पोहोचल्या, जेथे वर्डप्रेस प्लगइन्स, अपाचे टॉमकॅट आणि सिसएड सिस्टम्समध्ये तडजोड करण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला.
सायबर गुन्हेगारीपासून स्वत:ची सुरक्षा करा
गुंतवणूक करण्यापूर्वी वेबसाइट्स आणि अॅप्सची सत्यता तपासा.
शक्य असल्यास, नेहमीच भारत सरकारद्वारे अधिकृत आणि सेबीद्वारे देखरेख केलेल्या शेअर बाजारात गुंतवणूक करा.
जर तुम्हाला टेलिग्राम किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे कमी कालावधीत गुंतवणूक करून शेअर बाजारात भरपूर पैसे कमविण्याची ऑफर मिळाली तर सावधगिरी बाळगा.
मोठ्या कंपनीच्या खोट्या नावाला बळी पडू नका; फसवणूक करणारे मोठ्या कंपन्यांच्या नावाने फसवणूक करत आहेत.
बाप नंबरी बेटा 10 नंबरी! पासपोर्ट प्रकरणात ‘या’ नेत्याला कोर्टाने सुनावली 7 वर्षांची शिक्षा






