Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भेटायला बोलावले अन् कोयत्याने सपासप वार केले! पुण्यात अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील भिडे पूल परिसरात ऐन गर्दीच्या वेळी जुन्या वादातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 03, 2026 | 04:55 PM
भेटायला बोलावले अन् कोयत्याने सपासप वार केले! पुण्यात अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला

भेटायला बोलावले अन् कोयत्याने सपासप वार केले! पुण्यात अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला

Follow Us
Follow Us:
  • भिडे पूल परिसरात शौर्य मोहितेवर कोयत्याने हल्ला
  • ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या हल्ल्यात शौर्य गंभीर जखमी
  • डेक्कन पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील भिडे पूल परिसरात ऐन गर्दीच्या वेळी जुन्या वादातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शौर्य मोहिते आणि आरोपी अल्पवयीन मुलांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी शौर्यला भेटण्यासाठी बोलावले होते. सोमवारी संध्याकाळी भिडे पुलाजवळील हॉटेल मुरलीधरच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर हा प्रकार घडला. शौर्य तेथे पोहोचल्यानंतर हल्लेखोरांचे टोळके त्याच्यासोबत काही वेळ बोलत थांबले. त्यानंतर तिघांच्या टोळक्याने अचानक त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात शौर्य गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून काहीजण शौर्यला भेटण्यासाठी बोलावत होते. मात्र, जुना वाद पुन्हा उफाळू नये म्हणून तो त्यांच्या भेटीला जाणे टाळत होता. सोमवारी मात्र हल्लेखोरांनी त्याला बोलावून घेत त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर संबंधितांचा सहभाग याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी मुख्य अभियंता अटकेत! न्यायालयाच्या आदेशानंतर येरवडा कारागृहात रवानगी

वरोऱ्यात दिवसाढवळ्या मारहाणीची घटना!

वरोरा तालुक्यातील एकोना माईन्स परिसरात कोळसा वाहतुकीच्या वादातून एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड व दांड्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात मंगेश दिलीप चव्हाण (वय २७, रा. स्नेहल नगर, अभ्यंकर वार्ड, चंद्रपूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी पाच अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यातील भिडे पूल परिसरात कोणती घटना घडली?

    Ans: जुन्या वादातून तीन अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने १७ वर्षीय शौर्य मोहिते याच्यावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले.

  • Que: शौर्य मोहिते याच्यावर हल्ला का करण्यात आला?

    Ans: शौर्य आणि आरोपी अल्पवयीन मुलांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून त्याला भेटायला बोलावून हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.

  • Que: या प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: डेक्कन पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: An incident involving a life threatening attack on a minor has taken place in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी मुख्य अभियंता अटकेत! न्यायालयाच्या आदेशानंतर येरवडा कारागृहात रवानगी
1

ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी मुख्य अभियंता अटकेत! न्यायालयाच्या आदेशानंतर येरवडा कारागृहात रवानगी

वरोऱ्यात दिवसाढवळ्या मारहाणीची घटना! ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच जणांचा हल्ला
2

वरोऱ्यात दिवसाढवळ्या मारहाणीची घटना! ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच जणांचा हल्ला

Beed Suicide Case: पतीचे अनैतिक संबंध आणि रोजच्या मारहाणीला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; ॲसिड प्राशन करून संपवले आयुष्य!
3

Beed Suicide Case: पतीचे अनैतिक संबंध आणि रोजच्या मारहाणीला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; ॲसिड प्राशन करून संपवले आयुष्य!

वरणगाव हादरलं! उड्डाणपुलाखाली तरुणाला गाठून गोळ्या झाडल्या; तरुणीला भेटायला आला अन्…
4

वरणगाव हादरलं! उड्डाणपुलाखाली तरुणाला गाठून गोळ्या झाडल्या; तरुणीला भेटायला आला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.