Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी मुख्य अभियंता अटकेत! न्यायालयाच्या आदेशानंतर येरवडा कारागृहात रवानगी

ठेकेदाराकडून लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 03, 2026 | 04:43 PM
ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी मुख्य अभियंता अटकेत! न्यायालयाच्या आदेशानंतर येरवडा कारागृहात रवानगी

ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी मुख्य अभियंता अटकेत! न्यायालयाच्या आदेशानंतर येरवडा कारागृहात रवानगी

Follow Us
Follow Us:
  • महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांना अटक
  • १९ हजार रुपये स्वीकारल्याची ठेकेदाराची तक्रार
  • एसीबीकडून सापळा रचून कारवाई
पिंपरी : ठेकेदाराकडून लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. एक दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांनी ही माहिती दिली.

 

महापालिकेतील ठेकेदाराच्या कामांच्या फाइलवर स्वाक्षरी करणे आणि बिलांच्या प्रक्रियेसाठी ओंभासे यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला ४५ हजार ७८५ रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तडजोड होऊन १९ हजार रुपये स्वीकारल्याची तक्रार संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून ओंभासे यांच्यावर कारवाई केली. त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी तपासासाठी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. महापालिकेतील वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, ओंभासे यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नसून, या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : वरोऱ्यात दिवसाढवळ्या मारहाणीची घटना! ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच जणांचा हल्ला

पुण्यात बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड

पुण्याच्या मध्यभागातून बनावट पाचशेच्या नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या तसेच ते बनविणाऱ्या टोळीचा प्रकार उघडकीस आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी चौघांना अटक करत त्यांच्याकडून ५ लाख ६४ हजार रुपये किमतीच्या १ हजार १२८ बनावट नोटांसह प्रिंटर, मॉनिटर आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. या टोळीने आणखी किती बनावट नोटा तयार केल्या आणि त्या चलनात आणल्या आहेत का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. आता नोटा नेमक्या कुठे बनविण्यात आल्या, याबाबत पोलिस तपास करत आहेत. सलमान जैनद्दीन राजे (वय ३०, रा. आंबेगाव केडगाव, ता. दौंड) शाफाज फिरोज अन्सारी (वय ३०, रा. नालासोपारा), विशाल विलास गलांडे (वय ३७, रा. सुरुपखन वाडी , ता. माण, जि. सातारा), अभिजित रावसाहेब कांबळे (वय ३०, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रमोद ओंभासे यांना कोणत्या आरोपाखाली अटक करण्यात आली?

    Ans: ठेकेदाराच्या कामांच्या फाइलवर स्वाक्षरी करणे आणि बिलांच्या प्रक्रियेसाठी लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांना अटक करण्यात आली.

  • Que: प्रमोद ओंभासे यांनी किती रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे?

    Ans: सुरुवातीला ४५ हजार ७८५ रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तडजोड होऊन १९ हजार रुपये स्वीकारल्याची तक्रार ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

  • Que: न्यायालयाने प्रमोद ओंभासे यांच्याबाबत काय निर्णय दिला?

    Ans: एक दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने प्रमोद ओंभासे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

Web Title: Pramod ombhase of the pimpri chinchwad municipal corporation has been remanded to judicial custody nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • Arrested
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी
1

Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी

वरोऱ्यात दिवसाढवळ्या मारहाणीची घटना! ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच जणांचा हल्ला
2

वरोऱ्यात दिवसाढवळ्या मारहाणीची घटना! ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच जणांचा हल्ला

Beed Suicide Case: पतीचे अनैतिक संबंध आणि रोजच्या मारहाणीला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; ॲसिड प्राशन करून संपवले आयुष्य!
3

Beed Suicide Case: पतीचे अनैतिक संबंध आणि रोजच्या मारहाणीला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; ॲसिड प्राशन करून संपवले आयुष्य!

वरणगाव हादरलं! उड्डाणपुलाखाली तरुणाला गाठून गोळ्या झाडल्या; तरुणीला भेटायला आला अन्…
4

वरणगाव हादरलं! उड्डाणपुलाखाली तरुणाला गाठून गोळ्या झाडल्या; तरुणीला भेटायला आला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.