crime (फोटो सौजन्य: social media )
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे धक्के बसत आहे आता अहिल्यानगर येथून एक मोठा धक्का बसला आहे. अहिल्यानगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नेत्याचे नाव किरण काळे आहे. किरण काळे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहरप्रमुख आहे. किरण काळेवर अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात एका एकवीस वर्षीय विवाहित महिलेने गुन्हा दाखल केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नी झोपेत असतानाच पतीने चिरला गळा; पोटावरही केले सपासप वार
जीवे मारण्याची धमकी
मिळालेल्या माहितीनुसार. पीडित महिला आणि तिचा पती त्यांच्यात सतत वाद होत होते. याला मदत मिळण्याकरिता पीडित महिला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे एकमेकांच्या संपर्कात आले होते. पीडित महिलेला मदत करण्याचे आमिष दाखवून शहर प्रमुख किरण काळे याने महिलेवर बलात्कार केला. २०२३ ते २०२४ पर्यंत किरण काळे याने स्वतः च्या संपर्क कार्यालयात बलात्कार केला. तसेच ही गोष्ट कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा किरण काळेने दिल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
पोलिसांच्या ताब्यात
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात किरण काळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण काळेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. किरण काळेंवर गुन्हा दाखल झाल्याने ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबई हादरली! तीन जणांनी केला १० वर्षाच्या मुलावर अत्याचार
दरम्यान, मुबई येथू अत्याचाराची धक्कदायक घटना समोर आली आहे. १० वर्षाच्या मुलावर तीन जणांनी अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील चुनाभट्टी येथे घडली आहे. पीडित मुलगा व तिघेजण एकमेकांच्या ओळखीचे असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित अल्पवयीन मुलगा व तिघेजण एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यामुळे त्याला फसवून तिघांनी चुनाभट्टी येथील निर्जनस्थळी नेले. तेथे त्यांनी अल्पवयीन मुलावर अत्याचार केला आहे. घटनेनंतर मुलगा परत घरी आला. तो त्यावेळी घाबरलेला होता. त्याच्या आईने विचारणा केली असता त्याने हा घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दोन आरोपी अल्पवयीन
आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असून त्या अल्पवयीन मुलांची शनिवारी डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर एका १८ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२), ११५ (२) व ३(५) सह पोक्सो कायदा कलम ६ व १० अंतर्गत गुन्हा दाखल केला.