छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. एका प्रसिद्ध उद्योजकाचा मृतदेह आढळून आला. दौलताबाद धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी नाक्याजवळील पुलाखाली मृतदेह आढळून आला आहे. मृत उद्योजकाचे नाव सागर रामभाऊ परळकर असे आहे. त्यांनी आपल्या पत्नीला ‘मी तासाभरात घरी पोहोचतो’ असे फोन करून सांगितले आणि काही तासातच त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. सागर परळकर हे वाळूज एमआयडीसीतील पुष्पक ऍग्रो कंपनीचे संचालक आहेत.
Mumbai Crime News: मुंबई हादरली! तीन जणांनी केला १० वर्षाच्या मुलावर अत्याचार, दोन आरोपी अल्पवयीन
ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. रविवारी ते दुचाकीने कन्नडला गेले होते. त्यानंतर ते घरी परातलेच नाही. आणि सोमवारी सायंकाळी थेट करोडी टोल नाक्याजवळ पुलाखाली मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृतदेहाजवळ मोबाईल आणि आधार कार्ड सापडून आला त्यामुळे त्यांची ओळख पटली. मृतदेहाजवळ त्याची दुचाकी तुटलेल्या अवस्थेत सापडली. याबाबतीत कुटुंबीयांना कळवण्यात आले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत पाठवण्यात आला
पुष्पक अॅग्रो कंपनीत संचालक
मिळालेल्या माहितीनुसार, सागर परळकर मूळचे पैठणचे आहेत. ते कुटुंबासह कांचनवाडीत राहायचे. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांची भागीदारीत पुष्पक अॅग्रो कंपनी असून ते संचालक होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.
नेमकं काय घडलं?
रविवारी दुपारी ते कंपनीच्या कामासाठी दुचाकीने कन्नडला गेले होते. रात्रीच्या सुमारास ९ वाजता पत्नीसोबत शेवटचा संपर्क त्यांनी केला. त्यांनी त्यावेळी ‘मी हतनूरजवळ आहे. तासाभरात येतो’ असे सांगितले. आणि त्यानंतर त्यांच्याशी संपर्कच झाला नाही. मध्यरात्रीपासून हवालदिल झालेल्या सागर यांच्या कुटुंबीयांनी , मित्रांनी त्यांचा शोध सुरू केला. तेव्हा सोमवारी दुपारी त्यांचा मृतदेह दौलताबाद धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी टोलनाक्यानजीक पुलाखाली आढळून आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. हा अपघात आहे की घातपात आहे, याचा तपास पोलीस करत आहे.
संभाजीनगरमधील या ‘भोंदू बाबा’चा पर्दाफाश
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील एका भोंदू बाबाचे कारनामे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. शिऊर गावात एक मंदिर आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून या मंदिरात ढोंगीपणाचे जाळे पसरवून लोकांना त्रास देत होता आणि फसवत होता. तो ढोंगी बाबा म्हणायचा, “मी भुते भूत उतरवतो, लग्न होत नसेल तर लग्न जुळवून देतो, मुले होत नाहीत त्यांना माझ्या अघोरी पूजेमुळे मुले होतील.”
उपचाराच्या नावाखाली तो बाबा लोकांना घाणेरडे चप्पल तोंडाजवळ घेऊन जायचा. जबरदस्तीन स्वत:ची लघवी पियाला भाग पाडायचा.लोकांना काठीने मारहाण करणे ही या ढोंगी माणसासाठी सामान्य गोष्ट होती.अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या ढोंगीचा हा संपूर्ण खेळ त्यांच्या गुप्त कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आणि संबंधित पोलीस ठाण्यात या ढोंगीविरुद्ध तक्रार केली, त्यानंतर या बाबाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे उघड होताच, धार्मिक गुरु त्याच्या अनुयायांसह पळून गेला आणि अजूनही फरार आहे.
Shikrapur Crime: ओळख वाढवली, लग्नाचे आमिष दिले अन् हॉटेलवर नेऊन…; शिक्रापूरमध्ये घडली धक्कादायक घटना