चारित्र्याच्या संशयावरून पत्नी झोपेत असतानाच पतीने चिरला गळा (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA ))
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच पती-पत्नीमध्ये नेहमी वाद-भांडण हे होत असतात. पती कायम पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने अधिक वाद व्हायचे. यातूनच पतीने झोपेतच चाकूने पत्नीचा गळा चिरून व पोटात वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना पाचोरा तालुक्यात घडली आहे. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात घडली आहे. प्रियंका खुशाल भदाणे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. जारगाव येथील प्रियंकाचा पती खुशाल भदाणे हा बांधकाम कामगार होता. पाचोऱ्यातील श्रीकृष्ण हौसिंग सोसायटीत दोन महिन्यांपूर्वी खुशाल पत्नी व दोन लहान मुलांसह भाड्याच्या घरात वास्तव्यास आला होता. या दोघांमध्ये सतत वाद होत असल्याने प्रियंका माहेरी गेली होती.
हेदेखील वाचा : Shikrapur Crime: ओळख वाढवली, लग्नाचे आमिष दिले अन् हॉटेलवर नेऊन…; शिक्रापूरमध्ये घडली धक्कादायक घटना
बरेच दिवस पत्नी माहेरी असल्याने खुशाल याने लहान मुलांसाठी पत्नीला विनवण्या करून काही दिवसांपूर्वीच पाचोरा येथे आणले होते. तरी देखील पत्नीच्या चारित्र्यावर खुशालचा संशय होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमी खटके उडायचे. यातच १९ जुलैला रात्री दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. मात्र, या वादातून खुशालने २० जुलैला पहाटे चारच्या सुमारास उठून झोपेत असलेल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा अर्धा गळा चिरला. त्यानंतर पोटावर सपासप वार केले.
आईला पाहून मुलांनी केला आरडाओरड
चाकूने वार केल्यामुळे प्रियंका रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. अशा परिस्थितीत खुशालनेही गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आईच्या किंकाळ्यांमुळे झोपलेली दोन्ही लहान मुले जागी झाली. त्यांनी आईला पाहून आरडाओरड केल्याने शेजारी धावत आले. त्यांनी गळफास घेणाऱ्या पतीस रोखून त्याचे प्राण वाचवले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसही घटनास्थळी पोहोचले. यानंतर खुशाल भदाणे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
हेदेखील वाचा : Crime News: प्रेमासाठी काय पण! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या थेट गळ्याला…; साताऱ्यातील धक्कादायक घटना