
crime (फोटो सौजन्य: social media)
पैशाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी सिगारेटचे चटके दिले अन् नंतर गळाच चिरला
काय घडलं नेमकं?
हिदायत पटेल हे काल (मंगळवारी) दुपारच्या दोन वाजताच्या नमाजनंतर मोहाळा गावातील मशिदीत नमाज पठण करायला गेले होते. त्यांनी नमाज पठण केला आणि मशिदीतून बाहेर पडताच उबेदने हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला केला. हिदायत पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हल्ल्यात जबर मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी सांगितले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला. या घटनेने कुटुंबात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
काय नेमकं प्रकरण?
हिदायत पटेल २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. २०१९ मध्ये लोकसभेचा निकाल लागला. त्यांनतर हिदायत पटेल यांचं गाव असलेल्या मोहाळा गावात राजकीय वादातून भाजपा अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी मतीन खाँ शेर खाँ पटेल यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह 10 आरोपी होते. भादंविच्या कलम ३०२ सह इतर चार कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पटेल यांच्यावर हल्ला झाला. हिदायत पटेल यांच्यावर हल्ला करणारा आरोपी उबेद हा हत्या झालेल्या मतीन यांचा पुतण्या आहे. उबेद ने आपल्या काकाच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हिदायत पटेल यांच्यावर हा हल्ला केल्याचे म्हंटले जात आहे.
हत्या झालेले हिदायत पटेल कोण?
अकोल्यातील काँग्रेसचा मोठा मुस्लिम चेहरा
हिदायत पटेल जिल्ह्यातील मोठे सहकार नेते. 25 वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक आहे.
35 वर्षांपासून जिल्ह्यातील महत्वाच्या अकोट बाजार समितीचे माजी सभापती आणि सध्या संचालक
पटेल 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार.
पटेल 2014 मध्ये दुसर्या स्थानावर. तर 2019 मध्ये तिसर्या स्थानावर.
आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष.
Bhayander Crime : ऑनलाईन फसवणूक टोळीचा पर्दाफाश; गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई
Ans: मंगळवारी दुपारी अकोल्यातील अकोट तालुक्यातील मोहाळा गावात, नमाजनंतर मशिदीतून बाहेर पडत असताना हल्ला झाला.
Ans: जुना राजकीय व कौटुंबिक वाद असल्याची प्राथमिक माहिती असून उबेद पटेल या तरुणावर हल्ल्याचा आरोप आहे.
Ans: ते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, अकोल्यातील प्रभावी मुस्लिम नेतृत्व, दोन वेळा लोकसभा उमेदवार आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ सहकार नेते होते.