Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime News: ‘मला इथून घेऊन जा’ म्हणत रडली… काही वेळातच विवाहितेचा मृत्यू; पतीसह सासरच्यांवर गुन्हा

अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे लग्नानंतरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेपूर्वी पतीने धमकीचा फोन केल्याचा आरोप असून, मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून सासू-सासऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 05, 2026 | 12:13 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नानंतर मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याचा आरोप.
  • घटनेपूर्वी पतीने “तिला घेऊन जा, नाहीतर काही बरेवाईट होईल” असा धमकीचा फोन केल्याचा दावा.
  • आईच्या तक्रारीवरून पती ताब्यात; सासू आणि सासऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल.
अकोला: अकोला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच ‘तुमची आमच्यासमोर औकात नाही’ असे हिणवत होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका तरुण विवाहितेने गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी महिलेच्या पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या विवाहित तरुणीचे नाव तनुजा असे आहे. तनुजा हीचा विवाह एप्रिल २०२४ मध्ये वाडेगाव येथील विशाल मानकर याच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगाही झाला. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेले. मात्र त्यानंतर पती, सासू आणि सासऱ्यांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तुम्ही गरीब आहात, तुमची आमच्यासमोर औकात नाही. असे टोमणे मारणे सुरु झाले, तिच्यावर रोज मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले जात होते. तनुजाने या त्रासाबाबत अनेकदा आपल्या आईकडे आपबीती सांगितली होती.

डॉक्टरांनी केले मृत घोषित

३ ऑगस्ट रोजी रुपेरी तनुजाच्या नवऱ्याने तिच्या बहिणीला फोन केला होता. तनुजाला इथून घेऊन जा नाहीतर माझ्या हातून काही तरी बरेवाईट होईल. अशी उघड धमकी त्याने दिली होती. या फोननंतर घाबरलेल्या तनुजाने स्वतः नातेवाईकांना फोन करून मला तात्काळ इथून घेऊन जा, अशी विनंती करत रडण्यास सुरुवात केली. मात्र नातेवाईक काही पावले उचलणार तोच तनुजाने गळफास घेतल्याची बातमी समोर आली आहे. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक’ व्हिडिओचा वापर करून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 1.7 कोटींना…

गुन्हा दाखल

तनुजाच्या आईने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारींवरून पोलिसांनी पती विशाल मानकर, सासू सविता मानकर आणि सासरे दिलीप मानकर यांच्याविरोधात गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर पतीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी पोलीस करत आहे. पोलीस या प्रकरणी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई तीव्र केली जाईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

माहेरी अंत्यसंस्कार

तनुजावर तिच्या माहेरी अश्रूधाल्या नयनोबांनी अंत्यसंस्कार केले.या घटनेमुळे माहेरच्या लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

दिवसाढवळ्या शाळेत शिक्षिकेची हत्या; 20 हून अधिक चाकूने वार अन् नकाबपोशाचा हल्ला CCTV कॅमेरात कैद

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे.

  • Que: पोलिसांनी कोणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे?

    Ans: पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध.

  • Que: घटनेपूर्वी कोणती महत्त्वाची बाब समोर आली?

    Ans: पतीने विवाहितेच्या बहिणीला धमकीचा फोन केल्याचा आरोप समोर आला.

Web Title: Akola crime news married woman wept pleading take me away from here died shortly after case registered against husband and in laws

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.