केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या 'डीपफेक' व्हिडिओचा वापर करून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 1.7 कोटींना... (संग्रहित फोटो)
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ‘डीपफेक’ व्हिडिओचा वापर करून आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी व्यावसायिकाची १ कोटी ७ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४७ वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने सोशल मीडियावर निर्मला सीतारामन यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरून तयार केलेला बनावट (डीपफेक) व्हिडिओ प्रसारित केला. व्हिडिओत गुंतवणूक योजनेची शिफारस केल्याचा भास निर्माण केला. व्हिडिओवर विश्वास ठेवून व्यावसायिकाने लिंकवर क्लिक केले. नंतर सायबर चोरट्यांनी त्याच्याशी संपर्क साधत एलॉन मस्क यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगितले.
9 महिन्यांच्या बाळाचे तोंड फेव्हीक्विकने चिटकवण्याचा प्रयत्न; पुण्यात महिलेचं संतापजनक कृत्य
सायबर चोरट्याने बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर नफा दाखवून तक्रारदाराचा विश्वास संपादित केला. नंतर टप्प्याटप्प्याने १ कोटी ७ लाखांची रक्कम गुंतवली. मात्र, सायबर चोरट्याने परतावा न देता त्यांची फसवणूक केली. नागरिकांनी अशा प्रकारच्या डीपफेक व्हिडिओ, सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या जाहिराती आणि अवास्तव परताव्याचे आश्वासन देणार्या योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
सोशल मीडियावरील जाहिरातींवर विश्वास ठेऊ नका
कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनी, संकेतस्थळ आणि योजनेची माहिती तपासावी, तसेच केवळ सोशल मीडियावरील व्हिडिओसह जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
जमीन हडपण्यासाठी बनावट दस्तऐवजांचे रॅकेट
सावंगी येथील गट क्रमांक २३१/१ मधील १७ गुंठे जमीन बेकायदेशीररीत्या हडपण्यासाठी बनावट खरेदीखते, सातबारा, नमुना क्रमांक ८, करेक्शन डीड तसेच मागील तारखांचे नोटरी करारनामे तयार करून एका वकीलाची सुमारे ५० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार १ ते १७ फेब्रुवारी दरम्यान घडला आहे. या प्रकरणात तब्बल १८ जणांविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आली लहर केला कहर ! 112 हेल्पलाईनवर खून झाल्याची माहिती; यंत्रणेला दमवणारा ‘तो’ कॉलर रडारवर






