काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव पवन वडगावे असं आहे. भाड्याने राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. लग्नाचे आमिष दाखवत त्याने हे भयंकर कृत्य केले. या घटनेनंतर पीडित मुलीने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गंभीर अवस्थेत तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरोपी पोलिस कर्मचारी अटक नाहीये. त्यामुळं संबंधित ठाणेदार आणि आरोपी पोलिसाला मदत करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
ठिय्या आंदोलन
या मागणीसाठी शेडको समाज बांधव आणि नातेवाईकांचा पोलिस उपविभागीय कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन चाललं आहे. या प्रकरणात बाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो तिथेच कार्यरत होता. त्यामुळे येथील पोलीसांनी पवन वडगावे’ला फरार होण्यास मदत केल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. दुसरीकडे हा तपास स्थानिक पोलिसांकडून वरिष्ठ पातळीवर वर्ग करण्याची मागणी होतीये. मुलगी अल्पवयीन होती तेव्हापासून तिच्यावर आरोपी अत्याचार करत असल्याने त्याच्यावर पॉस्को लावण्याची मागणी होतीये.
तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. दरम्यान, आरोपी पोलीस कर्मचारी अद्याप फरार असून, त्याच्या तातडीने अटकेची मागणी अधिक तीव्र झाली आहे. आरोपी अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Ans: अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा.
Ans: आत्महत्येच्या प्रयत्नानंतर उपचारादरम्यान.
Ans: आरोपीची तातडीने अटक आणि निष्पक्ष, वरिष्ठ पातळीवर तपास.






