Crime News: कोकणातील ‘या’ नदीतून अवैध वाळू उपसा; पोलिसांनी तिघांना थेट…
नेमकं काय घडलं
आशिष, आदित्य आणि दर्शन (सर्वांचे वय 15) हे तिघे सोमवारी संध्याकाळी मित्राच्या वाढदिवसासाठी घराबाहेर पडले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते परतले नाहीत. कुटुंबीयांनी रात्रभर शोध घेऊनही त्यांचा काहीच पत्ता न लागल्याने त्यांनी तत्काळ सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुलांचा शोध घायला सुरुवात केली.
रेल्वे स्टेशन, बसस्थानके आणि शहरातील प्रमुख ठिकाणी तपासणी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन मित्रपरिवाराची चौकशी पोलिसांनी सुरू केली. तांत्रिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलं शेगाव दर्शनासाठी घरून निघाली होती, पण ट्रेनमध्ये झोप लागल्यामुळे ती मुंबईपर्यंत पोहोचली. सोशल मिडोइयावर त्यांचे फोटो शेअर करत मदतीचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान मुलांची शेवटची लोकेशन भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तातडीने स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि रेल्वे पोलीस (GRP/RPF) यांच्या मदतीने भुसावळ रेल्वे स्टेशनवर सापळा रचला. पोलिसांनी अतिशय शिताफीने कारवाई करत तिन्ही मुलांना सुरक्षित ताब्यात घेतले. या पथकाने केलेल्या जलद आणि धडाकेबाज कामगिरीमुळे बेपत्ता झालेल्या मुलांना केवळ काही तासांतच शोधणे शक्य झाले. पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कुटुंबियांना मुले सापडल्याची माहिती मिळताच सुटकेचा निश्वास टाकला.
अकोल्यात सावकारीचा त्रास जीवघेणा! 20% व्याज, धमक्या आणि जमीन बळकावली
अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातून एक हृदयपिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पातुरमध्ये सावकारीच्या जाळ्यात अडकल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवले. या व्हिडिओत तरुणाने गंभीर आरोप केले. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृतकाच्या भावाने गुन्हा दाखल केला असून दोन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Ans: मुलं शेगाव दर्शनासाठी निघाली होती, पण ट्रेनमध्ये झोप लागल्याने थेट मुंबईपर्यंत पोहोचली.
Ans: सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, मित्रपरिवाराची चौकशी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोधमोहीम गतीमान करून भुसावळ स्टेशनवर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
Ans: मुलं सुरक्षित मिळाल्याने कुटुंबीयांनी मोठा दिलासा व्यक्त केला आणि पोलिसांच्या जलद कामगिरीचे कौतुक केले.






