Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alibaug Crime: सोशल मीडियावरून झाली ओळख, भेटायला बोलावलं आणि लोखंडी हातोड्याने…, ‘तू माझी नाही झालीस तर…

रायगडच्या कनकेश्वर मंदिर परिसरात सोशल मीडियावरून ओळखलेल्या तरुणाने प्रेयसीवर लोखंडी हातोड्याने हल्ला केला. ती गंभीर जखमी असून आरोपी आणि त्याच्या मित्रांचा शोध पोलिस करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 15, 2025 | 11:55 AM
कराडमध्ये एकाला मित्रांकडूनच मारहाण; एका मेसेजबद्दल विचारले अन्...

कराडमध्ये एकाला मित्रांकडूनच मारहाण; एका मेसेजबद्दल विचारले अन्...

Follow Us
Follow Us:

अलिबाग: रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावरून ओळख झाली आणि नंतर ती मैत्री वाढली. आणि पुढे जे घडलं ते खूप थरारक होत. एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर लाकडी दांडा असलेल्या लोखंडी हातोड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील कनकेश्वर मंदिर परिसरात सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे. आरोपीचं नाव सुरज बुरांडे असे आहे.

Solapur Crime: चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केली पत्नीची हत्या, सोलापूर येथील घटना

नेमकं काय घडलं?

अलिबाग: पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, सुरज आणि संचिताची ओळख वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर झाली होती. दरम्यान १० ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास सुरजने फोन करून कनकेश्वर मंदिरात जाण्याचा आग्रह धरला. ती तिथे गेली दोघे मंदिरात दर्शन घेऊन खाली उतरत असतांना सुरजने “तुला एक सरप्राइज द्यायचं आहे” असं सांगत तिला वडाच्या झाडाखाली नेलं आणि काही क्षण डोळे बंद करण्यास सांगितलं आहे. क्षणातच त्याने बॅगेतून लोखंडी हातोडा बाहेर काढला आणि तिच्या डोक्यावर व कपाळावर जबरदस्त वार केले.

त्यानंतर संचिता गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडली. हल्ल्यानंतर सुरजने “तू माझी नाही झालीस, तर कोणाचीही होऊ देणार नाही” असे म्हणत तिला धमकावले आणि अंधार पडेपर्यंत त्या ठिकाणीच बसवून ठेवले. रात्रीच्या सुमारास तीव्र वेदना सहन न झाल्याने पिडीत तरूणीने उपचारासाठी विनंती केली. त्यावर तीने सुरजला “जर तू मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलास, तर तुझ्या प्रपोजचा विचार करेन,” असं सांगितलं. त्यानंतर सुरजने तिला रुग्णालयात नेल्याचे तरूणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.

मित्रांनी काय म्हंटल…

सूरज बुरांडेने हल्ल्यानंतर आपली बहिणीचा पती विनायक पाटील (रा. साळाव) आणि मित्र सौरभ कुलाबकर यांना संपूर्ण घटना सांगितली. त्यावेळी ते घटनास्थळी आले आणि त्यांनी सूरजला “तू तिला ठार मारायला हवे होते” असे सांगितल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सुमारास सुरज रुग्णालयात आला आणि पीडितेला धमकावत म्हणाला, मी तुझ्यावर हल्ला केला आणि ही गोष्ट जर कोणाला सांगितली, तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार मारेन. माझे काका कसे आहेत. हे तुला माहिती आहे. तसेच त्याचे भावोजी विनायक पाटील आणि मित्र सौरभ कुलाबकर यांनी सुद्धा जीव घेण्याच्या धमक्या दिल्याने पीडित मुलगी घाबरली होती.

सायंकाळी उशिरा उपचारासाठी नेले तेव्हा सुद्धा सुरज आणि त्याचे साथीदार विनायक पाटील व सौरभ कुलाबकर यांनी तिला सतत धमक्या दिल्याचे पीडित तरुणीने सांगितले. या हल्ल्यात तिच्या डोक्याला, पायाला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या ती सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी सुरज बुरांडे आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरु केला आहे. या घटनेनंतर कनकेश्वर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Chhatrapati Sambhajinagar crime: शाळेच्या निर्जनस्थळी जाणं जीवावर बेतलं, मैदानावर तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

Web Title: Alibaug crime if you dont become mine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • Alibaug
  • alibaug crime
  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

SIR प्रक्रियेचा मुद्दा तापला; रायगड काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
4

SIR प्रक्रियेचा मुद्दा तापला; रायगड काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.