सोलापूर: सोलापूर शहरातील न्यू बुधवार पेठ परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मृत महिलेचं नाव यशोदा सुहास सिद्धगणेश, तर आरोपीचं नाव सुहास तुकाराम सिद्धगणेश असं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताय? तर थांबवा; ‘इथं’ पोलिसांनी केली धडक कारवाई
वादातून पेटली वैवाहिक कलहाची ठिणगी
मिळालेल्या माहितीनुसार, सुहास आणि यशोदा यांच्यात घरगुती कारणावरून सकाळी तीव्र वाद झाला. या वादाच्या रागात सुहासने पत्नीवर हात उगारला आणि नंतर चाकूने सपासप वार करत तिचा खून केला. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. मात्र शेजाऱ्यांनी आवाज ऐकून घरात धावत जाऊन पाहिले असता यशोदा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
स्थानिक रहिवाशांनी तात्काळ पोलिसांना कळवून यशोदाला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. आरोपी सुहास सिद्धगणेश याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावून टाकला दरोडा, मारहाण करत सोने आणि पैसे लुटले
सोलापूर शहरात झालेल्या दरोड्याने नारीकांमध्ये दहशत निर्माण केले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्रधारी टोळीने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत नागरिकांना चाकूच्या धाकावर दरोडा टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना सोलापूर शहरातील अभिषेक नगरमधील अवंती हौसिंग सोसायटीमध्ये मध्यरात्रीच्या अडीचच्या सुमारास घडली आहे.