Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत

अंबरनाथच्या पालेगावमध्ये प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणाचे अपहरण करून लोखंडी रॉड, बांबू आणि चाकूने अमानुष मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान त्याचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संताप उसळला असून पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 02, 2026 | 03:42 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू.
  • मृत्यूनंतर संतप्त नागरिकांनी आंदोलन करत पोलिस ठाण्याला घेराव घातला आणि नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड केली.
  • पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
अंबरनाथ: अंबरनाथ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच याप्रकरणी भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.

काय घडलं नेमकं?

२३ जूनला रात्रीच्या सुमारास पालेगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय संबंधित तरुणीच्या चुलत्याला होता. याच कारणावरून तरुणीच्या चुलत्याने त्याच्या साथीदारांनी पीडित तरुणाचे फिटनेस जिमसमोरून अपहरण केले. त्यानंतर त्याला एका मोकळ्या मैदानात नेऊन लोखंडी रॉड, बांबू आणि चाकूच्या साहाय्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. मात्र तरुणाला तातडीने उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र १ जुलै रोजी सायंकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड

मारहाण करणारे आरोपी नगरसेविकेशी संबंधित असल्याचा आरोप करत त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. मात्र नगरसेवक पूनम पाटील यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला. सर्व आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा ओमचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

पाच आरोपी अटकेत

पोलिसांनी ग्रामस्थांसोबत चर्चा केली. आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित संशयित आरोपींचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दीड महिन्यांपूर्वीच झाले लग्न; घरात CCTV, शेजाऱ्यांशी बोलल्याने मारहाण, 26 वर्षीय महिलेचं टोकाचं पाऊल

अंबरनाथ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड महिन्या पूर्वीच झाले होते लग्न. पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी डॉक्टर पतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावले. शेजाऱ्यांशी बोलली म्हणून बेदम मारहाण करण्यात आली. अखेर सासरच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात डॉक्टर पतीला अटक करण्यात आली आहे. तर सासू आणि दीर यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

💡

Frequently Asked Questions

  • Que: अंबरनाथमध्ये तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला?

    Ans: प्रेमसंबंधाच्या संशयातून त्याचे अपहरण करून लोखंडी रॉड, बांबू आणि चाकूने अमानुष मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • Que: या घटनेनंतर परिसरात काय घडले?

    Ans: संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आणि भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड केली.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला असून इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Ambernath crime youth beaten brutally over suspicion of a romantic affair and eventually dies five accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
1

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
2

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Beed Crime: लग्नात मानपान कमी, ‘स्कॉर्पिओ’साठी 10 लाखांची मागणी; विवाहितेचा अमानुष छळ
3

Beed Crime: लग्नात मानपान कमी, ‘स्कॉर्पिओ’साठी 10 लाखांची मागणी; विवाहितेचा अमानुष छळ

Gujarat Crime: तीन वर्षे पत्नी असल्याचा विश्वास; प्रत्यक्षात पुरुष असल्याचं समजताच दगडाने ठेचून हत्या
4

Gujarat Crime: तीन वर्षे पत्नी असल्याचा विश्वास; प्रत्यक्षात पुरुष असल्याचं समजताच दगडाने ठेचून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.