पोलीस सियासोबत ‘लीलाकुंज’मध्ये दाखल
पुण्यातील कोंढवा परिसरातील ‘लीलाकुंज’ या निवासस्थानी पोलीस सियाला घेऊन पोहोचले. घटनेच्या दिवशी तिने वापरलेले कपडे जप्त करून त्यांचा पंचनामा करण्यात आला. पोलीस सुमारे एक तास सियाच्या घरी थांबले. पोलिसांच्या तपासानुसार, याच ठिकाणी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलण्याच्या कटाची कथित तालीम केली होती. यावेळी सियाचे कुटुंबीयही घरी उपस्थित होते.
केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित
तिसऱ्या व्यक्तीच्या सहभागाचाही तपास
या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असली, तरी त्यांच्या कटात आणखी एखाद्या व्यक्तीचा सहभाग होता का, याचाही तपास लोणावळा पोलीस करत आहेत. रिमांडदरम्यान पोलिसांनी न्यायालयात या अँगलने दोन्ही आरोपींकडे चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या कटामागे आणखी कोणी होते का, याबाबत उत्सुकता वाढली असून पोलिसांचा तपास त्या दिशेने सुरू आहे. मात्र, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत नाव किंवा माहिती जाहीर केलेली नाही.
#WATCH | Lonavala | Ketan Agarwal murder case | Police brings the accused, Siya, to her residence as the investigation into the murder of Ketan Agarwal continues pic.twitter.com/qt9OItx5vU — ANI (@ANI) July 2, 2026
पुरावे गोळा करण्यावर पोलिसांचा भर
आतापर्यंत सियाचा भाऊ साहिल, वडील प्रवीण आणि आई पूजा गोयल यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच सिया आणि केतन यांचे लग्न ठरवण्यात मध्यस्थी करणाऱ्या मित्तल दाम्पत्याचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. बालीला प्री-वेडिंग शूटसाठी जाताना मुंबई विमानतळापर्यंत सोडणाऱ्या कॅब चालकाकडूनही पोलिसांनी महत्त्वाची माहिती घेतली आहे.
दरम्यान, घटनेनंतर सियाच्या घरात पंचनामा करून तिचे कपडे, मोबाईल आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. ३ जुलै रोजी सियाची पोलीस कोठडी संपत असल्याने तपासाच्या दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे, आरोपींची चौकशी आणि तपासातील निष्कर्ष यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असून, या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: घटनेच्या दिवशी परिधान केलेले कपडे, मोबाईल आणि इतर महत्त्वाच्या वस्तू जप्त करून पंचनामा करण्यात आला.
Ans: सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कटात आणखी एखाद्या व्यक्तीचा सहभाग होता का, याचा पोलीस तपास करत आहेत.
Ans: ३ जुलै रोजी कोठडी संपत असल्याने त्याआधी पुरावे गोळा करणे आणि चौकशी पूर्ण करण्यावर पोलिसांचा भर आहे.






