Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी चंद्रकांत शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, तिघांना अटक; मुख्य आरोपीचा शोध सुरू

माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या अपहरणानंतर हत्या केल्याच्या प्रकरणाने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी तिघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 27, 2026 | 01:35 PM
शेतकरी चंद्रकांत शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, तिघांना अटक; मुख्य आरोपीचा शोध सुरू

शेतकरी चंद्रकांत शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, तिघांना अटक; मुख्य आरोपीचा शोध सुरू

Follow Us
Follow Us:
  • शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचे अपहरण करून हत्या
  • तिघांना अटक; २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
  • मुख्य आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू
नांदेड : माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या अपहरणानंतर हत्या केल्याच्या प्रकरणाने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी तिघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली असून, लवकरच त्याला जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी दिली. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी जयकुमार ऊर्फ शेरा गायकवाड, आमेर शेख आणि इम्रान खान यांना अटक केली आहे.

 

मुदखेडमध्येही स्वतंत्र गुन्हा दाखल

या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मुख्य आरोपीचा माग काढण्यासाठी वजिराबाद पोलीस ठाण्याची दोन पथके तसेच स्थानिक गुन्हे शाखेची पथके तपासात सक्रिय झाली आहेत. मुख्य आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले आहे. मुदखेड पोलिसांनी दत्ता गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित घटनांची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगानेही तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

हे सुद्धा वाचा : चिमुरडीच्या हातापायांवर सिगारेटचे चटके, डोक्याचे केसही कापले; आरोपी वडिलांना अटक

‘के.एफ. एंटरप्रायजेस’चीही पडताळणी

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘के.एफ. एंटरप्रायजेस’ या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. संबंधित संस्था आणि प्रकरणात चर्चेत आलेली संस्था एकच आहे का, याची पडताळणी पोलिसांकडून सुरू असल्याचे वृत्त आहे. या संस्थेचा प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या अपहरण व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीची अटक, मुदखेडमध्ये दाखल झालेल्या स्वतंत्र गुन्ह्याचा तपास आणि संस्थेच्या संबंधांबाबतची पडताळणी या सर्व बाबींकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : कामावर जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात दोन कामगारांचा मृत्यू; खेड तालुक्यातील धक्कादायक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: शेतकरी चंद्रकांत शिंदे हत्या प्रकरणात किती जणांना अटक झाली?

    Ans: वजिराबाद पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

  • Que: आरोपींना किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे?

    Ans: न्यायालयाने त्यांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • Que: मुख्य आरोपीसाठी पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: मुख्य आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत.

Web Title: The police have arrested three people in connection with the murder case of farmer chandrakant shinde nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

चिमुरडीच्या हातापायांवर सिगारेटचे चटके, डोक्याचे केसही कापले; आरोपी वडिलांना अटक
1

चिमुरडीच्या हातापायांवर सिगारेटचे चटके, डोक्याचे केसही कापले; आरोपी वडिलांना अटक

Pradeep Purnekar Murder Case: पतीची ७ वेळा चौकशी, आता थेट माजी महापौर! पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास ऐन वळणावर
2

Pradeep Purnekar Murder Case: पतीची ७ वेळा चौकशी, आता थेट माजी महापौर! पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास ऐन वळणावर

Guwahati Shooting News: गुवाहाटीत रक्तरंजीत थरार! हॉटेलमध्ये बेछुट गोळीबार; महिलांसह ६ जणांच्या हत्येने खळबळ
3

Guwahati Shooting News: गुवाहाटीत रक्तरंजीत थरार! हॉटेलमध्ये बेछुट गोळीबार; महिलांसह ६ जणांच्या हत्येने खळबळ

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीध निवडणुकीचे आज निकाल जाहीर होणार
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीध निवडणुकीचे आज निकाल जाहीर होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.