
आधी त्रास, नंतर मारहाण अन् अखेर खून; एकतर्फी प्रेमातून महिलेला संपवलं
याबाबत मृत महिलेचा मुलगा योगेश देविदास आळकुटे (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे. अनिता आळकुटे या मागील सुमारे २० वर्षांपासून वडारवाडी ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होत्या. ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीवर संतोष धोत्रे काम करत असल्याने अनिता आणि त्याची ओळख होती.
योगेश आणि आईने संतोषला समजावले
सुमारे महिनाभरापूर्वी अनिता यांनी संतोष धोत्रे हा आपल्यावर प्रेम असल्याचे वारंवार सांगत असून, नकार दिल्याने विनाकारण त्रास देत असल्याचे मुलगा योगेश धोत्रे याला सांगितले होते. त्यानंतर योगेश आणि त्याच्या आईने संतोषला समजावून सांगितले होते. शुक्रवारी (दि. २३) सकाळी साडेनऊच्या सुमारास अनिता या बिगारी कामासाठी जात असताना कावेरी हॉस्पिटलजवळ संतोष याने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसे त्यांनी घरी आल्यानंतर मुलाला सांगितले होते. त्यावेळीही संतोषला समजावून सांगण्यात आले; मात्र पोलिसांत तक्रार देण्यात आली नव्हती. दरम्यान, मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास अनिता नेहमीप्रमाणे वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात कामासाठी गेल्या.
पूर्वीच्या त्रासाची फिर्यादीत नोंद
आईला एकतर्फी प्रेमातून त्रास दिला जात असल्याचे तसेच यापूर्वी मारहाण झाल्याचेही योगेश याने फिर्यादीत नमूद केले आहे. संतोष धोत्रे याने आईच्या डोक्यात लोखंडी वॉल मारून खून केल्याचा आरोप त्याने केला आहे. या प्रकरणी योगेश आळकुटे याने पोलिसांकडे फिर्याद दिली असून, पुढील तपास कॅम्प पोलिस करत आहेत.
संतोषने तुझ्या आईचा खून केला
सकाळी १०.१८ वाजता योगेश घरी असताना त्याचा चुलत मामा सूरज तागडकर यांचा फोन आला. ग्रामपंचायत कार्यालयात लवकर ये, संतोष धोत्रे याने तुझ्या आईचा खून केला आहे, असे त्यांनी सांगितले. ही माहिती मिळताच योगेश याने ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली. तेथील सरपंचांच्या कार्यालयात त्याची आई अनिता या डोक्याला गंभीर जखम झालेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांच्या डोक्याजवळ रक्त लागलेला पाण्याचा लोखंडी वॉल पडलेला होता.
Ans: अहिल्यानगरमधील भिंगार येथील वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंचांच्या दालनात मंगळवारी (दि. २७) सकाळी अनिता देविदास आळकुटे (वय ४२) यांचा खून झाला.
Ans: संतोष नाना धोत्रे (रा. वडारवाडी) याच्यावर खुनाचा आरोप आहे. एकतर्फी प्रेमातून तो अनिता आळकुटे यांना वारंवार त्रास देत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Ans: मृत महिलेचा मुलगा योगेश देविदास आळकुटे (वय २६) याने भिंगार कॅम्प पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, संतोष धोत्रे याने अनिता यांच्या डोक्यात पाण्याचा लोखंडी वॉल मारून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहेत.