Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Crime: लग्नाच्या दोन महिन्यांतच हत्या! आधी दारु पाजली, नंतर क्रूरतेने पत्नीची हत्या केली; का केली हत्या?

अमरावतीत पतीने पत्नी नीलिमाची झोपेत दगड व चाकूने निर्घृण हत्या केली. दोन महिन्यांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. पत्नीच्या आग्रहाला कंटाळून सनी इंगोलेने गुन्हा केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 03, 2025 | 01:09 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दोन महिन्यांपूर्वी नीलिमा व सनी इंगोलेचे लग्न.
  • पत्नी सतत सोबत राहण्याचा आग्रह करत होती.
  • मद्यपानानंतर झोपेत सनीने तिच्यावर दगड व चाकूने हल्ला केला
अमरावती: अमरावती येथे एक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीचा गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव नीलिमा उर्फ पिंकी खरबडे असे नाव आहे. तर आरोपी पतीचे नाव सनी उर्फ नितीन इंगोले असे आहे. दोन महिन्यापूर्वीच नीलिमा आणि सनीचं लग्न झालं होतं. मग दोन महिन्यात असं काय घडलं जे की थेट हत्या करण्याचा निर्णय सनीने घेतला. पोलिसांनी घटनास्थळ गाठत अधिक तपास सुरु केला असून गुन्हे शाखेने या हत्येचा उलगडा केला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

Mumbai Crime: दारूच्या नशेत १४ वर्षीय मुलीवर आणि पत्नीवर ब्लेडने केले वार; कारण काय?

काय घडलं नेमकं?

आरोपी पती सनी हा भूजल सर्वेक्षणच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात कार्यरत आहे. नीलिमा हिच्या पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर ती एकटी राहत होती. दोन महिन्यापूर्वीच तिने सनी सोबत लग्न केले होते. परंतु ते दोघे सोबत राहत नव्हते. त्यांनतर तिने त्याला त्याच्या घरी घेऊन जाण्याचा आग्रह करीत होती. यालाच तो कंटाळला होता.

३० नोव्हेम्बरला रात्री सनी नीलिमाच्या घरी दारूच्या बाटल्या घेऊन गेला. दोघांनीही मद्यपान केले. त्यानंतर ती महिला झोपी गेली. ती गाढ झोपेत असतांना सनीने तिच्या डोक्यावर दगडाने वार केले आणि तिच्या मानेवर चाकूने वार करून हत्या केली. हत्येनंतर सनी मागच्या दाराने बाहेर पडला.

त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत या घटनेचा तपास करायला सुरुवात केली. पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय सनीवर होता. गुन्हे शाखेने त्याचा मोबाइल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि घरातील डीव्हीआरची तपासणी सुरू केली. तपासात सनीचा मोबाइल दोन दिवस एकाच ठिकाणी असल्याचे दिसून आले. हत्येच्या वेळीदेखील तो नीलिमाच्या घरात असल्याचे लोकेशनवरून स्पष्ट झाले. या रक्तरंजित हत्येच्या घटनेननंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत मारेकरी सनी उर्फ नितीन इंगोलेंचा शोध घेतला व त्याला अटक केली. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

Chhatrapati Sambhajinagar: लग्नाचं आमिष! 3 लाख घेत कोर्टात नोटरी लग्न… आणि सासरी जाताना नवरी अर्ध्या रस्त्यात फुर्रर्र!

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का केली?

    Ans: पत्नी नीलिमा त्याला त्याच्या घरी घेऊन जाण्याचा आग्रह करीत होती.

  • Que: घटना कशी घडली?

    Ans: दोघांनी दारू पिल्यानंतर नीलिमा झोपल्यावर सनीने दगडाने डोक्यावर आणि चाकूने मानेवर वार करून हत्या केली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तात्काळ तपास सुरु करून सनी इंगोलेला शोधून अटक केली आहे. तपास पुढे सुरू आहे.

Web Title: Amravati crime first he got drunk then brutally killed his wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • amravati
  • Amravati crime
  • crime

संबंधित बातम्या

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
1

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Health Update: अवयवदानातून मिळते इतरांना नवजीवन! अमरावतीत विविध उपक्रम; गैरसमज दूर करून जागृतीची गरज
2

Health Update: अवयवदानातून मिळते इतरांना नवजीवन! अमरावतीत विविध उपक्रम; गैरसमज दूर करून जागृतीची गरज

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
3

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
4

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.