काय घडलं नेमकं?
रात्री सव्वादोनच्या सुमारास झोपेत असतांना मुलीला काहीतरी चावल्यासारखे वाटले आणि तिला वेदना झाल्या. त्यावेळी तिला वडिलांनी आपला गळा चिरल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने आरडाओरडा केला तिला वाचविण्यासाठी आलेल्या पत्नी राजश्रीच्या पोटावरतीही ब्लेडने वार केला. या घटनेननंतर नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जखमी मायलेकींना शताब्दी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. आरोपी हनुमंताला अटक करण्यात आली आहे.
का केला हल्ला?
आरोपी हनुमंत सोनवळ याला दारूचे व्यसन आहे. तो त्याची पत्नी राजश्रीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करायचा. क्षुल्लक कारणांवरून वाद घालत होता. त्यामुळे तिने वांद्रे कोर्टात घटस्फोटाची केस दाखल केली. राजश्रीने तिच्या नालासोपाऱ्यातील वकिलांकडे घटस्फोटाच्या केसची माहिती घेतली. रविवारी ती उशिरा घरी आली आणि हनुमंताने इतका वेळ कुठे गेली होतीस असे विचारात तिला त्रास दिला. पत्नीने घर विकून पुण्याला जाण्याची इच्छा व्यक्त केली यानंतर दोघांमध्ये वाद झाला राजश्री आणि पत्नी हिला मारण्याची धमकी दिली आणि हनुमंत घराबाहेर पडला. त्यानंतर तो रात्री उशिरा घरी येत त्याने झोपलेल्या मुलीवर आणि पत्नी राजश्रीवर वार केले. या दोघानींवर उपचार सुरु असून दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत असून पोलीस पुढील तपास करत आहे.
Ans: ही घटना दहिसर येथील कोकणी पाडा भागात सोमवारी उशिरा रात्री घडली.
Ans: आरोपीला दारूचे व्यसन असून तो पत्नीच्या चरित्रावर संशय घेत असे. घटस्फोटाच्या प्रकरणामुळे त्याचा राग अधिक भडकला.
Ans: दहिसर पोलिसांनी आरोपी हनुमंत सोनवळला अटक केली असून तपास सुरू आहे.






