
crime (फोटो सौजन्य: social media)
अमरावती: अमरावतीच्या बडनेरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नसमारंभात नवरदेवावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेचा पूर्ण व्हिडीओ ड्रोनमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे.
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये सुजलराम समुद्रे यांचा लग्नसमारंभ सुरु होत. त्यावेळी दोन युवकांनी नवरदेव सुजलराम समुद्रेवर धारदार चाकूने हल्ला केला. लग्नासाठी सुरु असलेल्या ड्रोन शूटमध्ये हा व्हिडीओ कैद झाला आहे. नवरदेव सुजलराम जखमी झाल्यावर, नववधू ही त्या ठिकाणी चक्कर येऊन पडली. नवरदेवाचे वडील आरोपींना पकडायला गेले त्यावेळी त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला आहे. त्यानंतर आरोपी दुचाकी वाहनावर बसून पळून गेले. त्यांचा संपूर्ण व्हिडीओ ड्रोन कॅमेरात कैद झाला आहे.
या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
चांदुररेल्वे कोठडी मृत्यू प्रकरणात आठ पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल, अमरावती एसपींकडून निलंबनाची कारवाई
अमरावती येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. चांदुररेल्वे पोलीस स्टेशनच्या कोठडीत रितेश मेश्राम यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ८ पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. आता अमरावतीच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मोठी कारवाई केली आहे. न्यायालयीन चौकशी अहवालाच्या आधारे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या 8 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी ठरलेल्या तत्कालीन ठाणेदार अजय अहिरकर यांच्यावरही प्रशासकीय कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये लॉ प्राध्यापिकेचा मोबाईल हॅक; ९० किमी दूरून व्हॉट्सअपमध्ये अनधिकृत लॉगिन