DESI KATTA (फोटो सौजन्य - PINTEREST )
अमरावती शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका दुकानात गोळीबार झाल्याची घटना घडली. देशी कट्ट्याने हि फायरिंग करण्यात आली आहे. हि घटना सहाराच्या जयस्तंभ चौकातील जय भोळे पान सेंटरच्या दुकानावर घडली. दुकानातील साहित्याची देखील तोडफोड करण्यात आली. हि घटना शुक्रवारी ४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. फायरिंग झाल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तीन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेत आहे.
सोलापूरात दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू; एकीची प्रकृती चिंताजनक
नेमकं काय घडलं?
वसंत टॉकीज परिसरात विक्की मंगलानी यांचे जय भोले केंद्र नामक पानमटेरियल विक्रीचे दुकान आहे. ४ एप्रिलला रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांचे भाऊ सागर मंगलानी व एक कर्मचारी दुकानात होते. त्यावेळी तीन अज्ञात हल्लेखोर अचानक दुकानात शिरले. विक्की कुठे आहे, अशी विचारणा त्यांनी सागर यांना केली. सागर हे त्यांच्याशी बोलत असतानाच हल्लेखोरांपैकी एकाने देशी कट्ट्याने दुकानात एक राउंड फायर केला. त्यानंतर हल्लेखोरांनी दुकानातील साहित्याची तोडफोड करून तेथून पळ काढला.
तातडीने कोतवाली पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सह पोलिस घटना स्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीमध्ये तिन्ही अज्ञात हल्लेखोर दिसून आले आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत असून त्यांनी सागर मंगलानी यांच्या तक्रारीवरून हल्लेखोरांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलीस त्यांचा तपास घेत आहे. या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही.
प्रॉपर्टीच्या वादातून हल्ला
प्रॉपर्टीच्या वादात ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. विकी मंगलानी प्रॉपर्टी बिजनेसमध्ये आहे. प्रॉपर्टीच्या वादात आणि खंडणी मागण्याच्या इराद्याने आरोपीनी हा गोळीबार केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.