Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : फरार गुंडाच्या बेकायदा हॉटेलवर चालवला बुलढोझर; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

वडगाव बुद्रुक भागातील सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात दहशत माजविणारा गुंड मनोज पाडुळे याने बांधलेल्या बेकायदा हॉटेलवर पोलिसांनी बुलढोझर चालवून ते पाडले आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 04, 2026 | 12:30 AM
फरार गुंडाच्या बेकायदा हॉटेलवर चालवला बुलढोझर; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

फरार गुंडाच्या बेकायदा हॉटेलवर चालवला बुलढोझर; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील वडगाव बुद्रुक भागातील सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात दहशत माजविणारा गुंड मनोज पाडुळे याने बांधलेल्या बेकायदा हॉटेलवर पोलिसांनी बुलढोझर चालवून ते पाडले आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पाडुळे आणि साथीदारांवर भारती विद्यापीठ पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती. त्यानंतर तो फरार झाला आहे.

 

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोका गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मनोज पाडुळे अद्याप फरार आहे. त्याच्या टोळीला आर्थिक बळ पुरविण्यासाठी सिंहगड कॅम्पस येथील बेकायदा ‘मातोश्री हॉटेल’चा वापर होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर महसूल विभाग व संबंधित यंत्रणांच्या मदतीने बुलडोझरच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सिंहगड कॅम्पस परिसरातील हे हॉटेल अनेक वर्षांपासून गुन्हेगारी कारवायांचे केंद्र बनले होते. टोळीचे सदस्य येथे नियमितपणे एकत्र येत होते. परिसरात दहशत निर्माण करणे, गुन्हेगारी कारवायांचे नियोजन करणे तसेच टोळीच्या हालचालींसाठी या ठिकाणाचा वापर केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. मनोज पाडुळे याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारहाण यांसह गंभीर स्वरूपाचे सुमारे १५ गुन्हे दाखल आहेत. सिंहगड कॅम्पस आणि परिसरात त्याच्या टोळीची दहशत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पावरून पिंपरी पालिकेत गोंधळ; विरोध डावलून 430 कोटींच्या ऐनवेळच्या विषयाला मंजुरी

‘सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात पाडुळे याने बेकायदा हाॅटेल बांधले होते. या भागातील मोकळ्या जागेवर बांधलेल्या हॉटेल व्यवसायातून पाडुळे टोळीला आर्थिक रसद मिळत होती. मकोका कारवाई केल्यानंतर तो फरार झाला असून, या टोळीला मिळणारी आर्थिक रसद तोडण्यासाठी बेकायदा हाॅटेलवर कारवाई करण्यात आली’, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला पुन्हा धमकी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पोलिसांकडून तपास सुरू

Web Title: An absconding gangsters illegal hotel has been demolished using a bulldozer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…
1

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी
2

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई
3

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
4

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.