Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात; चालकाचे नियत्रंण सुटले अन् थेट…

काळेपडळ परिसरात विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन निघालेल्या स्कूल व्हॅनचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे नियत्रंण सुटल्याने स्कूल व्हॅन एका लाईटच्या पोलला जाऊन धडकली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 03, 2026 | 01:38 PM
पुण्यात पुन्हा 'ड्रंक अँड ड्राईव्ह'; भरधाव कारने अनेक वाहनांना उडवलं, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाच थेट...

पुण्यात पुन्हा 'ड्रंक अँड ड्राईव्ह'; भरधाव कारने अनेक वाहनांना उडवलं, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाच थेट...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात अपघातांमध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काळेपडळ परिसरात विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन निघालेल्या स्कूल व्हॅनचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे नियत्रंण सुटल्याने स्कूल व्हॅन एका लाईटच्या पोलला जाऊन धडकली. या अपघातात बस चालकासह चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

गुरूवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात चालक अमोल विनायक बोराटे (रा. काळेपडळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, साधना विद्यालयाची ही खासगी विद्यार्थी बस होती. विद्यार्थ्यांना घेऊन बसचालक अमोल हा घरी सोडण्यास जात होता. व्हॅनमध्ये जवळपास ३० ते ३५ विद्यार्थी होते. सर्व विद्यार्थी आठवी ते दहावीमधील होते. व्हॅन म्हसोबा चौकात आल्यानंतर अचानक चालकाचे नियत्रंण सुटून बस एका लाईटच्या पोलला धडकली. त्यात बसचा पुढील भाग तुटला गेला. बसचा स्पीड मोठा होता. त्यामुळे बस चालक अमोल याच्यासह तीन ते चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती देत जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. एका विद्यार्थ्याला फॅक्चर झाल्याचे माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर चालकही जखमी झाला आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी क्रेनच्या मदतीने स्कूल व्हॅन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

हे सुद्धा वाचा : पुतळा हटवण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध; दुसऱ्या दिवशीही माढ्यात तणाव कायम

दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू

दिवे घाटात झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. सोमवारी मध्यरात्री हा अपघात झाला आहे. सुंदर कैलास गंगावणे (वय ३८, रा. उंड्री-पिसोळी) व अनन्या सुंदर गंगावणे (वय १२) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, अपघातात सोहम सुंदर गंगावणे जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रक चालक हनुमंत बाबूराव मलकापुरे (वय ३२, रा. नागेवाडी, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अश्विनी उत्तम पवार (वय ३०, रा. कमलविहार सोसायटी, धनकवडी) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: An accident involving a school van carrying students has occurred in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Accident News
  • pune news
  • School Bus Accident

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.