Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

कॅफेची तोडफोड केल्याचे प्रकरण ताजे असताना पोलिसांनीच बुधवार पेठेत तरुणांना धमकावून लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे मात्र, पुणे पोलिसांची लक्तरे वेशीला टांगली जात आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 05, 2026 | 07:10 PM
पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:

पुणे : प्राचार्याकडून खंडणी उकळल्याचे प्रकरण आणि नुकतेच कॅफे चालकाला जबरदस्तीने कॅफे बंद करण्यास सांगत त्या कॅफेची तोडफोड केल्याचे प्रकरण ताजे असताना पोलिसांनीच बुधवार पेठेत तरुणांना धमकावून लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे मात्र, पुणे पोलिसांची लक्तरे वेशीला टांगली जात आहेत. या प्रकरणात पोलिस आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात विवेक पाटील तसेच राहुल दाभाडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २४ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रादार तरुण हडपसर भागात राहतो. तो एका हॉटेलमध्ये कामाला आहे. तो (दि. २९ जुलै) दोन मित्रांसोबत शनिवारवाडा पाहण्यास आला होता. तेथून तरुण आणि त्याचे मित्र फिरत लक्ष्मी रस्त्यावर आले. रात्री अकराच्या सुमारास ते बुधवार पेठ परिसरातून निघाले होते. त्यावेळी नाकाबंदी सुरू होती. पोलिस शिपाई विवेक पाटील आणि राहुल दाभाडे हे दुचाकीवरुन तेथे आले. दोघांनी तरुण आणि त्याच्या मित्रांना अडवले. त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. त्या तिघांनी मोबाइलमधील आधारकार्ड त्यांना दाखविले. नंतर दोघांनी तरुणासह मित्रांना धमकावले. ‘तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल. तुम्हाला न्यायालयात न्यावे लागेल, असे सांगितले.

तेव्हा तरुण आणि त्याच्याबरोबर असलेले मित्र घाबरले. पोलिस शिपाई पाटील आणि दाभाडे यांनी कारवाई न करण्यासाठी तिघांकडून प्रत्येकी ५ हजार रुपये असे १५ हजार रुपये मागितले. तेव्हा तरुणाने ‘आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. मित्राकडून दोन हजार रुपये ऑनलाइन मागवून घेतो’, असे सांगितले. तरुणाला दुचाकीवरुन घेऊन बुधवार पेठेत गेले. तेथील एका ओळखीच्या महिलेच्या मोबाइलवर ऑनलाइन पद्धतीने २ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. तरुणाने हॉटेल मालकाशी संपर्क साधला. अडचणीत असल्याचे सांगून हॉटेल मालकाला तातडीने २ हजार रुपये पाठवून देण्यास सांगितले. महिलेच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर हा प्रकार कोणाला सांगायचा नाही, अशी धमकी त्यांना दिली.

हा प्रकार घडल्यानंतर तरुण आणि मित्र घरी निघाले. त्यांनी कॅब बुक केली. कॅबने जाताना त्यांनी कॅब चालकाला हा प्रकार सांगितला. कॅबचालकाने याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकला. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली. चौकशीत दोघांनी बुधवार पेठेत तरुणांना धमकावून पैसे घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : एकेकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा, आता देतोय धमक्या; बिश्णोई टोळीच्या लोणकरचे सरकारला आव्हान

नव्याने दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून रात्री ड्युटीवर असताना लुटमारीचे प्रकार यापुर्वीही घडले आहेत. परंतु, यामुळे पुर्ण पोलिस दलाची प्रतिमा मलिन होत असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. यापुर्वी एका उपनिरीक्षक व रीलस्टार महिला कर्मचाऱ्यांनी थेट प्राचार्याकडून खंडणी उकळल्याचे प्रकरण उजेडात आले होते. दोन दिवसांपुर्वी कॅफेत तोडफोड करणाऱ्या उपनिरीक्षकाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर ह्या दोन कर्मचाऱ्यांचा प्रताप उजेडात आला आहे.

Web Title: An extortion case has been registered against two police personnel from pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना
1

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

धक्कादायक! बँकेच्या खोलीतच महिलेवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ब्रँच मॅनेजरला केली अटक
2

धक्कादायक! बँकेच्या खोलीतच महिलेवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ब्रँच मॅनेजरला केली अटक

एकेकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा, आता देतोय धमक्या; बिश्णोई टोळीच्या लोणकरचे सरकारला आव्हान
3

एकेकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा, आता देतोय धमक्या; बिश्णोई टोळीच्या लोणकरचे सरकारला आव्हान

पुण्यात आता चालणंही झालं अवघड; पादचाऱ्याच्या डोक्यात दगड मारुन रोकड नेली पळवून
4

पुण्यात आता चालणंही झालं अवघड; पादचाऱ्याच्या डोक्यात दगड मारुन रोकड नेली पळवून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.