Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग

शाळेतील जुनी ओळख काढून इन्स्टाग्रामवरून पुन्हा संपर्क साधत एका २४ वर्षीय जीम ट्रेनर तरुणीचा एका माथेफिरुने तब्बल सात महिने पाठलाग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 27, 2026 | 11:48 AM
तू शहर सोडून जा, नाहीतर तुला...; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग

तू शहर सोडून जा, नाहीतर तुला...; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : शाळेतील जुनी ओळख काढून इन्स्टाग्रामवरून पुन्हा संपर्क साधत एका २४ वर्षीय जीम ट्रेनर तरुणीचा एका माथेफिरुने तब्बल सात महिने पाठलाग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तिचे नकळत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता तिच्या मित्रालाही धमकावले आहे. ही घटना नोव्हेंबर २०२४ ते २५ जून २०२६ दरम्यान काल्डा कॉर्नर परिसरात घडली आहे. कृष्णा सुभाष गवळी (वय २४, रा. जय भवानीनगर) असे पीडितेला धमकावणाऱ्या माथेफिरुचे नाव असून, त्याच्या विरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात २४ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.

 

पीडिता ही गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहते व जीम ट्रेनर म्हणून काम करते. दहावीपर्यंत ती व्ही. ए. जाधव इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होती. त्याच शाळेत कृष्णा गवळी याच्याशी तिची ओळख झाली होती. त्यानंतर अनेक वर्षे दोघांमध्ये कोणताही संपर्क नव्हता. नोव्हेंबर २०२४ मध्ये आरोपीने इन्स्टाग्रामवरून पुन्हा संपर्क साधत शाळेतील ओळखीचा आधार घेत पीडितेचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवरून वारंवार फोन, मॅसेल व कॉल करून तो प्रेमासाठी आग्रह धरू लागला. मात्र कौटुंबिक कारणांमुळे कोणतेही संबंध ठेवण्यास पीडितेने स्पष्ट नकार दिला. तरीही आरोपी तिचा सतत पाठलाग करित होता.

हे सुद्धा वाचा : तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या

शाळेतील जुनी ओळख ठरली चांगलीच डोकेदुखी

एकदा कृष्णा आणि पीडिता भेटले होते, त्यावेळी त्याने पीडितेच्या नकळत तिचे फोटो काढले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तो पीडितेला सतत देत होता. सततच्या त्रासामुळे पीडितेने त्याचे फोन व मॅसेज बंद केले. त्यानंतर आरोपीने तिच्या मित्राला इन्स्टाग्रामवरून मॅसेज पाठवून, माझ्याशी बोल, अन्यथा तुझ्या घरी येऊन आरतीबाबत सर्व सांगतो, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. २५ जून रोजी आरोपीने पुन्हा पीडितेला फोन करून, तू हे शहर सोडून जा, नाहीतर तुला जीवे मारीन, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने जवाहरनगर पोलिस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गादेकर करीत आहेत

Web Title: An incident has occurred in chhatrapati sambhajinagar where a young man harassed a female gym trainer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • Arrested News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
1

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
2

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
3

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
4

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.