Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खड्ड्याने घेतला जेष्ठ नागरिकाचा जीव; कारचे चाक डोक्यावरून गेले अन्…

खड्यांमुळे दुचाकीचालक ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर पडल्यानंतर शेजारून निघालेल्या कारचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले आणि त्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 02, 2025 | 11:54 AM
खड्ड्याने घेतला जेष्ठ नागरिकाचा जीव; कारचे चाक डोक्यावरून गेले अन्...

खड्ड्याने घेतला जेष्ठ नागरिकाचा जीव; कारचे चाक डोक्यावरून गेले अन्...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : बेशिस्त वाहन अन् अतिवेगात पुण्यात अपघाती मृत्यू ‌वाढलेले असतानाच रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खड्यांमुळे दुचाकीचालक ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर पडल्यानंतर शेजारून निघालेल्या कारचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले आणि त्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

जगन्नाथ काशिनाथ काळे (वय ७३, रा.औंध) असे मृत्यू झालेल्या जेष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना नागरस रोड हॉटेल राहुल समोर भाले चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर घडली आहे. दरम्यान, अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, काळे हे दुपारी एकच्या सुमारास मोपेड दुचाकीवरून नागरस रोडकडून भाले चौकाकडे निघाले होते. त्यावेळी रस्त्यातील खड्ड्यात त्यांची दुचाकी गेली आणि त्यामुळे काळे हे दुचाकीवरून खाली पडले. यावेळी शेजारून निघालेल्या चारचाकी गाडीचे चाक काळे यांच्या डोक्यावरून गेले. गंभीर जखमी झाल्याने काळे यांना उपचारासाठी जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी सांगितले. काळे यांचा खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा : नाईट लाईफ, पब अन् हायप्रोफाईल पार्ट्यांवर पुणे पोलिसांची जोरदार कारवाई; चार वर्षात 705 ड्रग्ज पेडलर जेरबंद

पाऊस अन् खड्डे

पुणे शहरात महापालिकेकडून पावसाळापूर्व रस्त्यांची कामे झाली आहेत. डांबरीकरण तसेच खड्डे बुजवले गेले. पण, शहरात संततधार पाऊस व अधून-मधून मूसळधार पाऊस झाल्यानंतर पुन्हा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अनेक भागात जीवघेणी परिस्थिती या खड्यामुळे निर्माण झाली आहे. पावसात खड्यांमध्ये पाणी साचल्यानंतर ते वाहन चालकांना समजत देखील नाही. त्यातून मग अपघात होत असल्याचे वास्तव आहे.

औषधी आणण्यासाठी जाणं बेतलं जीवावर

पुणे जिल्ह्यातून एक अपघाताची घटना समोर आली आहे. औषधी आणण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर काळाने घाला घातला आहे. भरधाव मिक्सरखाली आल्याने ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (दि.१) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील पिके चौकात हा अपघात झाला आहे. पंडितराव माधवराव समर्थ (वय ६६, रा.बिजलीनगर,चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दरम्यान घटनेनंतर मिक्सर चालक पसार झाला आहे.

Web Title: An incident has occurred in pune where a citizen on a two wheeler died after falling into a pothole

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • pune news

संबंधित बातम्या

Himachal Bus Accident: हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशमध्ये बसवर कोसळला डोंगर, 15 प्रवाशांचा मृत्यू
1

Himachal Bus Accident: हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशमध्ये बसवर कोसळला डोंगर, 15 प्रवाशांचा मृत्यू

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!
2

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!

African snail In Pune : आफ्रिकन गोगलगायींचा पुण्यात प्रादुर्भाव; शहरी परिसंस्थेसाठी ठरतीये धोक्याची घंटा!
3

African snail In Pune : आफ्रिकन गोगलगायींचा पुण्यात प्रादुर्भाव; शहरी परिसंस्थेसाठी ठरतीये धोक्याची घंटा!

Gautami Patil : गौतमी पाटील म्हणजे चालता बोलता डान्सबार; पुण्यात आंदोलनकर्त्यांची जीभ घसरली
4

Gautami Patil : गौतमी पाटील म्हणजे चालता बोलता डान्सबार; पुण्यात आंदोलनकर्त्यांची जीभ घसरली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.