Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News : पेन्सिल चौक बनला आखाडा; दोन गटांत तुफान हाणामारी; १६ जण पोलिसांच्या रडारवर

Baramati News : बारामतीच्या पेन्सिल चौकात २४ ऑक्टोबर रोजी रात्री दोन गटांमध्ये सार्वजनिक ठिकाणी भांडण होऊन गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सावळ येथील १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 25, 2026 | 09:17 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • रात्री साडेआठच्या सुमारास चौकात गोंधळ
  • पोलिसांचा हस्तक्षेप; १६ जणांवर गुन्हा
  • सावळ गावातील सर्व आरोपी; पुढील तपास सुरू
  • सार्वजनिक ठिकाणी भांडण केल्यास कायद्याची तरतूद
Baramati News :शहरातील पेन्सिल चौक परिसरात शनिवारी रात्री दोन गटांमध्ये जोरदार वाद होऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. २४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Pune Crime News: पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! ‘आमराई रिसॉर्ट’मधील देहव्यापार रॅकेट उद्ध्वस्त

रात्री साडेआठच्या सुमारास चौकात गोंधळ

पेन्सिल चौक परिसरात काही जण एकमेकांशी वाद घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी काही जण सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी भांडण करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांचा हस्तक्षेप; १६ जणांवर गुन्हा

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संबंधितांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी शाहरुख शकिल शेख यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गणेश शरद आटोळे, विनोद विठ्ठल आटोळे, अनिकेत प्रमोद बेंगारे यांच्यासह एकूण १६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १९४ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट! १० तालुके दुष्काळग्रस्त; टँकरग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता

सावळ गावातील सर्व आरोपी; पुढील तपास सुरू

गुन्हा दाखल करण्यात आलेले सर्व १६ जण सावळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील रहिवासी असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणात पोलीस हवालदार टिळेकर यांनी दाखल अंमलदार म्हणून काम पाहिले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार प्रदीप काळे करीत असून, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सार्वजनिक ठिकाणी भांडण केल्यास कायद्याची तरतूद

भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १९४ हे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या भांडणांशी संबंधित आहे. दोन किंवा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी भांडण करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्यास त्याला ‘Affray’ म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी शांतताभंग करणारे भांडण मानले जाते. या कलमाच्या उपकलम (२) नुसार दोषी आढळल्यास एक महिन्यापर्यंत कारावास, एक हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Web Title: Baramati news pencil chowk turns into a battleground violent clash erupts between two groups 16 individuals under police scannercp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • Baramati Police
  • Marathi News
  • pune news

संबंधित बातम्या

ACB Trap : मातीच्या भरावासाठी लाचेचा व्यवहार ;सहा हजार रुपये घेताना वनपाल रंगेहात पकडला
1

ACB Trap : मातीच्या भरावासाठी लाचेचा व्यवहार ;सहा हजार रुपये घेताना वनपाल रंगेहात पकडला

Virus Alert : टेन्शन वाढलं ;दशकांपासून प्राण्यांमध्ये असलेला विषाणू माणसात दाखल; फ्रान्समध्ये पहिली नोंद
2

Virus Alert : टेन्शन वाढलं ;दशकांपासून प्राण्यांमध्ये असलेला विषाणू माणसात दाखल; फ्रान्समध्ये पहिली नोंद

Tech Explosion : अमेरिकेत टेक्नॉलॉजीचा महाविस्फोट; कोट्यवधी नागरिकांच्या घराजवळ उभी राहणार डेटा सेंटर्स
3

Tech Explosion : अमेरिकेत टेक्नॉलॉजीचा महाविस्फोट; कोट्यवधी नागरिकांच्या घराजवळ उभी राहणार डेटा सेंटर्स

Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँकेसाठी मुख्यमंत्र्यांचा फोन! १५ जागा बिनविरोध
4

Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँकेसाठी मुख्यमंत्र्यांचा फोन! १५ जागा बिनविरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.