सौजन्य - नवराष्ट्र टीम
विशेष म्हणजे, नेरूळ रेल्वे स्थानक परिसरातही दारू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाल्याची माहिती आहे. ड्राय डेच्या दिवशी दारू विक्रीवर निर्बंध असताना, अशा प्रकारे खुलेआम किंवा छुप्या पद्धतीने दारू उपलब्ध होत असेल, तर संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
दारू विक्रेते सक्रिय, अधिकारी मात्र गायब?
ड्राय डेच्या दिवशी अवैध दारूविक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष देखरेख आणि गस्त घालणे अपेक्षित असते. मात्र, नवी मुंबईतील अनेक भागांत कथित अवैध दारूविक्री सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष मैदानावर दिसत नसल्याचा आरोप केला जात आहे. विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू आणि कारवाई करणारी यंत्रणा गायब, अशी परिस्थिती असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
हप्तेखोरीच्या आरोपांची चौकशी होणार का?
काही भागांत अवैध दारूविक्री सातत्याने सुरू राहत असल्याने स्थानिक यंत्रणेच्या कामकाजाबाबत तसेच कथित हप्तेखोरीच्या आरोपांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, या आरोपांना अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून अवैध विक्रीला नेमके कोणाचे अभय आहे, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झोपेतून जागे व्हावे!
ड्राय डेच्या आदेशाची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात होणे गरजेचे आहे. मोठे खांदा, नेरूळ रेल्वे स्थानक परिसरासह नवी मुंबईतील ज्या ठिकाणी ड्राय डेच्या दिवशी अवैध दारूविक्री झाल्याचे आरोप आहेत, त्या ठिकाणांची तातडीने तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ड्राय डेच्या दिवशी दारू विक्रीचा धंदा तेजीत आणि सरकारी यंत्रणा मात्र शांत! शासनाच्या आदेशाला हरताळ फासणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई होणार की हा प्रकारही केवळ कागदोपत्री चौकशीपुरताच मर्यादित राहणार, याकडे आता नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
Ans: पनवेल तालुक्यातील मोठे खांदा गाव आणि नेरूळ रेल्वे स्थानक परिसरासह नवी मुंबईतील काही भागांत ड्राय डेच्या दिवशी अवैध दारूविक्री सुरू असल्याचा आरोप आहे.
Ans: अवैध दारूविक्री रोखण्याची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Ans: मोठे खांदा आणि नेरूळ परिसरासह संबंधित ठिकाणी तातडीने तपासणी करून अवैध दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी आणि कथित हप्तेखोरीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






