Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शासनाला घातला बारा लाखाचा गंडा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

संगनमत करून शासनाची १२ लाख ८० हजार १३६ रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 14, 2026 | 01:33 PM
शासनाला घातला बारा लाखाचा गंडा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

शासनाला घातला बारा लाखाचा गंडा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

परभणी : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या असून, असातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. परभणी येथील जिल्हा सहाय्यक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग कार्यालयात नेमणुकीस असलेल्या कनिष्ठ लिपिक, तत्कालीन आहरण व संवितरण अधिकारी आणि विद्यमान आहरण व संवितरण अधिकारी यांनी संगनमत करून शासनाची १२ लाख ८० हजार १३६ रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी (दि. १३) नवा मोंढा पोलिसात संबंधित तीनही अधिकारी – कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत नमूद केले आहे की, परभणी येथील जिल्हा सहाय्यक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग कार्यालयात नेमणुकीस असलेले कनिष्ठ लिपिक वीरेंद्र मोरेश्वर सुतवणे, तत्कालीन आहरण व संवितरण अधिकारी डॉ. विद्या भोजराज सरपे (कुलदीपक) आणि विद्यमान आहरण व संवितरण अधिकारी डॉ. पंढरीनाथ हरिभाऊ लक्कमवार यांनी लेखा व कोषागार कार्यालयातून २९ मे २०२० रोजी अधिकचे ३ लाख ३१ हजार ८६० रुपये, ३ जून २०२२ रोजी ३ लाख ३१ हजार ८६० रुपये, ३ मे २०२४ रोजी ३ लाख ३१ हजार ८६० रुपये आणि २५ ऑक्टोबर २०२४ रोजी २ लाख ८४ हजार ५५६ रुपये असे एकूण १२ लाख ८० हजार १३६ रुपये एरिअसची अधिकची रक्कम कार्यालयातील लिपिक वीरेंद्र सुतवणे याने स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर वळती करून शासनाची आर्थिक फसवणूक केली.

हे सुद्धा वाचा  : माजी उपमुख्यमंत्री बांदल यांच्यावरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

रक्कम केली वळती

या प्रकरणात उपसंचालक आरोग्यसेवा छत्रपती संभाजीनगर यांनी त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन करून चौकशी केली असता या चौकशीत सुद्धा कनिष्ठ लिपिक वीरेंद्र सुतवणे यांनी वैयक्तिक लाभासाठी चारवेळा शासनाची अधिकची रक्कम स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर वळती करून आहरण व संवितरण अधिकारी डॉ. विद्या सरपे (कुलदिपक) व विद्यमान आहरण संवितरण अधिकारी डॉ. पंढरीनाथ लक्कमवार यांनी कर्तव्यात कसूर व हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले. शासनाचे तब्बल १२ लाख ८० हजार १३६ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्या तिघांविरुद्ध नवा मोंढा पोलिसात भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ३१६ (५), ३४४, ३१८, २३६(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नवा मोंढा पोलिसांचे पोलीस निरीक्षक कमल शिंदे करीत आहेत.

Web Title: An incident has occurred where three individuals defrauded the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • fraud

संबंधित बातम्या

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?
1

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
2

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून
3

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
4

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.