Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किरकोळ वादातून दुचाकीस्वारावर चाकूने वार, बाणेरमधील घटनेनं मोठी खळबळ; आता पोलिसांनी…

दुचाकीवरुन भरधाव निघालेल्या तिघांना जाब विचारल्याने तरुणावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना पाषाण परिसरात घडली आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी दुचाकीस्वारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 02, 2026 | 04:40 PM
किरकोळ वादातून दुचाकीस्वारावर चाकूने वार, बाणेरमधील घटनेनं मोठी खळबळ; आता पोलिसांनी...

किरकोळ वादातून दुचाकीस्वारावर चाकूने वार, बाणेरमधील घटनेनं मोठी खळबळ; आता पोलिसांनी...

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यासह राज्यभरात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता दुचाकीवरुन भरधाव निघालेल्या तिघांना जाब विचारल्याने तरुणावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना पाषाण परिसरात घडली आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी दुचाकीस्वारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जीवन मेघावत, देवीदास मेघावत, रोहित मेघावत (तिघे रा. लमाणतांडा, पाषाण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने बाणेर पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार २२ वर्षीय तरुण पाषाणमधील सुतारवाडी परिसरात राहायला आहे. शनिवारी (१ ऑगस्ट) दुचाकीस्वार तरुण पाषाण परिसरातील शिवशक्ती चौकातून निघाला होता. त्यावेळी आरोपी मेघावत हे दुचाकीवरुन ट्रिपल सीट निघाले होते. तक्रारदार तरुणाच्या दुचाकीला आरोपींच्या दुचाकीने धडक दिली. दुचाकीस्वार तरुणाने आरोपींना जाब विचारला. नीट गाडी चालवा, असे सांगितले. या कारणावरुन आरोपींनी तरुणाला शिवीगाळ केली. एका आरोपीने त्याच्याकडील छोटा चाकू काढला. तरुणाच्या बोटावर चाकूने वार केला. झटापटीत एका आरोपीच्या हातातील कडे तरुणाच्या डोळ्याखाली लागले. तरुणाच्या डोळ्याजवळ दुखापत झाली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलिस हवालदार एन. आर. चोखरे अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : दौंडमध्ये तरुणीचे अपहरण, कारमध्ये बसवले अन्…; माजी नगराध्यक्षासह 11 जणांविरोधात गुन्हे दाखल

अनैतिक संबंधातून महिलेकडून एकावर चाकूने वार

अनैतिक संबंधातून एकावर महिलेने चाकूने वार केल्याची घटना मंगळवार पेठेत घडली आहे. या प्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रेश्मा रज्जाक शेख (वय ४०), रुखसार जावेद कोडगनुर (वय २३), सोहेल रज्जाक शेख (तिघे रा. भराव वस्ती, जुन्या बाजाराजवळ, मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३७ वर्षीय व्यक्तीने फरासखाना पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रेश्मा हिचे तक्रारदाराशी गेल्या १६ वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत. तक्रारदार तरुण तिला खर्चासाठी नियमित पैसे द्यायचा. आरोपी रेश्माने तिच्या एका मित्राला दुचाकी वापरण्यास दिली होती. या कारणावरुन २८ जुलै रोजी रात्री त्यांच्यात वाद झाला. वादातून आरोपी रेश्माने तक्रारदार तरुणाला शिवीगाळ करुन त्याच्या गालावर चाकूने वार केला. रेश्मा हिची विवाहित मुलगी आणि साथीदाराने तरुणाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे तक्रारदार तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार खिलारे तपास करत आहेत.

Web Title: An incident involving a knife attack on a young man has occurred in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?
1

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना
2

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना

बहिणीची छेड काढल्याचा राग, बेदम मारहाण करुन तरुणाचा खून; वाकडमधील घटनेनं खळबळ
3

बहिणीची छेड काढल्याचा राग, बेदम मारहाण करुन तरुणाचा खून; वाकडमधील घटनेनं खळबळ

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…
4

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.